कोल्हापूरच्या मामा-भाच्याचा फेमस वडापाव, वडाच्या झाडाशी आहे खास कनेक्शन

Last Updated:
झाडाखालचा वडापाव म्हणून महाराष्ट्रभर चर्चेत असणारं एक ठिकाण आहे. इथे वडापाव खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते.
1/7
एखादे झाड इतरांना फळे, फुले, सावली देत असते. फार फार तर ते झाड एखाद्याला आधार देऊ शकतं. मात्र कोल्हापुरात एका झाडाने चक्क एका खाद्यपदार्थाला प्रसिद्धी मिळवून दिलीय. कोल्हापुरातल्या एका भल्या मोठ्या वटवृक्षामुळेच ‘झाडाखालचा वडापाव’ आसपासच्या जिल्ह्यासह महाराष्ट्रभर ओळखला जाऊ लागला आहे.

advertisement
2/7
खरंतर आज कोल्हापुरात वडापाव खायला जायचं म्हटलं तर बऱ्याच जणांच्या तोंडात नाव असतं ते झाडाखालच्या वडापावकडे जाऊया. मात्र हे नाव त्या वडापावला मिळाले तरी कसे? हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही. कोल्हापुरात रुईकर कॉलनी नजीक सध्या झाडाखालचा वडापाव हे एक मोठं हॉटेल झालंय. मात्र पूर्वी या ठिकाणी फक्त एक वडापावची छोटी गाडी होती.

3/7
सध्या इम्रान मुजावर, भाऊ शौकत मुजावर आणि साकीब आणि सुबान कोण्णुर‌ हे त्यांचे 2 भाचे मिळून हा व्यवसाय सांभाळतात. इम्रान यांचे वडील उदरनिर्वाहासाठी जवळपास 40 वर्षांपूर्वी विशाळगडहून कोल्हापुरात आले होते. त्यांनी 1969 साली या वडाच्या झाडाखाली चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

4/7
यासोबतच हळूहळू त्यांनी वडा विकायलाही सुरुवात केली. पहिल्याच दिवशी पासून ग्राहकांना या वडापावची चव आवडू लागल्याने ग्राहक येथे गर्दी करू लागले. मात्र या गाड्याला काही नाव नव्हते. तेव्हा ग्राहकांना पत्ता सांगताना ‘झाडाखालचा वडापाव’ सांगितल्यानेच हे नाव प्रचलित झाल्याचे मालक इम्रान मुजावर यांनी सांगितले.

5/7
झाडाखालचा वडापावला येथे मिळणाऱ्या वडापावच्या चवीमुळे प्रसिद्धी मिळाली. मात्र अतिक्रमण कारणामुळे हा गाडा त्याच्या ठिकाणावरून हलवावा लागला. सन 2003 साली नवीन जागी गाडा सुरू केल्यानंतर ज्या वडाच्या झाडामुळे आपल्याला नाव मिळाले, ते देखील आपल्या सोबत हवे असे साकिब यांच्या आजोबांना वाटू लागले.

6/7
पूर्वीच्या ठिकाणी असणाऱ्या वडाच्या झाडाचे नवीन गाड्या शेजारी पुनर्रोपण करण्यात आले. सध्या झाडाखालच्या वडापाव या ठिकाणाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र चवीतील सातत्यामुळे या ठिकाणच्या वडापावने ग्राहकांची मने जिंकली आहेत.

7/7
येथील वडापाव बनवण्याची कृती ही सामान्यच असली तरी, येथे वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळेच तो चविष्ट बनतो. सध्या 25 रुपयांना मिळणाऱ्या या वडापावसाठी राजवाडी डाळीचे बेसन, इंदौरमधील उत्कृष्ट दर्जाचा बटाटा आणि मसाला वापरला जातो, असे इम्रान यांचे भाऊ शौकत यांनी सांगितले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement