advertisement

Mumbai : मुंबईच्या रस्त्यावर बड्या बापाच्या मुलाचे प्रताप, भरधाव कारने उडवलं, दाम्पत्याची मृत्यूशी झुंज

Last Updated:

मुंबईमध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला चिरडलं आहे. हा मुलगा भरधाव वेगाने किया सेलटास कार चालवत होता

मुंबईच्या रस्त्यावर बड्या बापाच्या मुलाचे प्रताप, भरधाव कारने उडवलं, दाम्पत्याची मृत्यूशी झुंज
मुंबईच्या रस्त्यावर बड्या बापाच्या मुलाचे प्रताप, भरधाव कारने उडवलं, दाम्पत्याची मृत्यूशी झुंज
राजेश शिंदे, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला चिरडलं आहे. हा मुलगा भरधाव वेगाने किया सेलटास कार चालवत होता, पण त्याचा कारवरचा ताबा सुटला आणि त्याने दुचाकीवून जाणाऱ्या दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार पती आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. पत्नीच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाली आहे.
advertisement
याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या विद्याविहार भागामध्ये सोमय्य कॉलेजच्या गेट क्रमांक 3 समोर हा भीषण अपघात झाला आहे.
5 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा धुरमिल पटेल आणि मिनल पटेल हे त्यांच्या दुचाकीवरून चालले होते, तेव्हाच 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा बेदरकारपणे गाडी चालवत आला आणि त्याने पटेल दाम्पत्याला धडक दिली. अपघातानंतर धुरमिल पटेल आणि मिनल पटेल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, पण दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. ही कार अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या नावावर आहे. कार मालकाचं नाव वालजी राजा भूषण असं आहे.
advertisement
पटेल दाम्पत्याचे परळमध्ये दुकान आहे, रात्री दुकान बंद करून दोघंही घाटकोपरमध्ये त्यांच्या घरी चालले होते, तेव्हा त्यांना सोमय्या कॉलेजच्या गेट क्रमांक 3 जवळ कारने धडक दिली. या धडकेमध्ये धुरमिल पटेल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसंच त्यांच्या छातीच्या बरगड्या, डावा गुडघा आणि उजव्या मनगटाला फ्रॅक्चर झालं आहे. तर मिनल पटेल यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं असून त्यांच्या उजव्या डोळ्याला आणि गुप्तांगाला गंभीर इजा झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईच्या रस्त्यावर बड्या बापाच्या मुलाचे प्रताप, भरधाव कारने उडवलं, दाम्पत्याची मृत्यूशी झुंज
Next Article
advertisement
चीनचा सोन्यावर मोठा 'डाव', गोल्ड मार्केट अस्थिर; गुंतवणूकदारांसाठी धोक्याचा इशारा, जगाची नजर अमेरिकेवर
चीनचा सोन्यावर मोठा डाव, गोल्ड मार्केट अस्थिर; गुंतवणूकदारांसाठी धोक्याचा इशारा
  • चीनकडे आता सोन्याचा डोंगर!

  • ड्रॅगनच्या खेळीने जागतिक बाजारपेठ हादरली

  • गुंतवणूकदारांसाठी धोक्याचा इशारा

View All
advertisement