नेमकं जाळ्यात कसं फसवायचे?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी डेटिंग अॅपवर बनावट प्रोफाईल तयार करून किंवा ओळख वाढवून तरुणांना जाळ्यात ओढायचे. ११ जानेवारी रोजी या टोळीने एका तरुणाला रात्रीच्या वेळी भेटायला बोलावलं होतं. तरुण घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्याला घेरले आणि कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी तरुणाजवळील सोन्याचे दागिने आणि महागडा मोबाईल हिसकावून घेतला. इतकेच नव्हे, तर त्याला जबरदस्तीने एटीएममध्ये नेऊन रोख रक्कम काढायला लावून तीदेखील लुटली.
advertisement
पाच आरोपींच्या आवळल्या मुसक्या
कोंढवा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहिल अकील शेख (वय १९, रा. कोंढवा), नुहान नईम शेख (वय १८, रा. कोंढवा), शाहिद शाहनूर मोमीन (वय २५, रा. कात्रज), इशान निसार शेख (वय २५, रा. कात्रज) आणि वाहिद दस्तगीर शेख (वय १८, रा. कोंढवा) अशा पाच जणांचा समावेश आहे.
आणखी दोन गुन्हे उघडकीस
पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीने अशाच प्रकारे पुण्यात आणखी दोन ठिकाणी गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. आरोपींकडून तीन मोबाईल, एक कोयता आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीने आणखी किती जणांना लुटले आहे, याचा तपास पोलीस करत असून त्या अनुषंगाने स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
