या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर मार्केट हे खरेदीसाठी नागरिकांचे आवडते ठिकाण ठरत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे विविध प्रकारचे कपडे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दादर मार्केटमध्ये व्हाइट कुर्ता आणि तिरंगा रंगाची ओढणी यांचा खास कॉम्बो फक्त 250 रुपयांना उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हा कॉम्बो लहान मुलींपासून ते 3XL साइजपर्यंत मिळत असल्याने सर्व वयोगटातील नागरिकांना याचा फायदा होत आहे.
advertisement
याशिवाय लहान मुलांसाठीही आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. 6 महिन्यांपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांचे टी-शर्ट फक्त 80 रुपयांपासून मिळत असून हे टी-शर्ट कॉटन आणि सिल्क अशा दोन्ही फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांमध्ये या स्टॉल्सकडे विशेष ओढ दिसून येत आहे. तसेच लहान मुलींसाठी सुंदर आणि आकर्षक फ्रॉक्स फक्त 200 रुपयांना मिळत असून त्यामध्ये विविध रंग, डिझाईन्स आणि पॅटर्न्सचा समावेश आहे.
हा सर्व माल दादर टीटी मिलन दुकानाच्या समोर असलेल्या स्टॉलवर उपलब्ध असून येथे खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. परवडणाऱ्या किमती, उत्तम दर्जा आणि विविध पर्याय यामुळे ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आवश्यक असलेले पोशाख एकाच ठिकाणी आणि कमी किमतीत खरेदी करायचे असल्यास हा स्टॉल एक उत्तम पर्याय आहे.





