Matar Dhokla Recipe : बेसन ढोकळ्यापेक्षा भारी, घरीच बनवा मटारपासून खास रेसिपी, खाल एकदम आवडीने
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
एरवी बेसनपासून ढोकळा करतो. पण आज आपण मटारपासून ढोकळा कसा करायचा याची रेसिपी बघणार आहोत.
छत्रपती संभाजीनगर : बाजारात मोठ्या प्रमाणात मटारच्या शेंगा विक्रीसाठी आलेल्या आहेत. यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे मटारपासून तयार केलेला ढोकळा. एरवी बेसनपासून ढोकळा करतो. पण आज आपण मटारपासून ढोकळा कसा करायचा याची रेसिपी बघणार आहोत. ऋतुजा पाटील यांनी ही रेसिपी सांगितलेली आहे.
मटार ढोकळा साहित्य
1 वाटी रवा, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी, 2 मिरच्या, एक आल्याचा तुकडा, कोथिंबीर, जिरे, मोहरी, कडीपत्ता, इनो, तेल, लाल तिखट एवढेच साहित्य याकरता लागणार आहे.
advertisement
मटार ढोकळा कृती
सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये रवा टाकायचा. त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आणि 10 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं. एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी मटार घालून घ्यायचं. 2 मिरच्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची.
advertisement
आपण जे मिश्रण केले होते त्यामध्ये मटारचे मिश्रण टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. एक चमचा तेल घालून घ्यायचं आणि एक इनो पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि मिक्स करायचे. आता एका खोलगट भांड्यात तेल लावून घ्यायचे आणि ते तयार केलेले मिश्रण टाकायचं त्यामध्ये आणि वरून थोडे तिखट टाकायचं. आता 15 ते 20 मिनिटे स्टीम करून घ्यायचे आहे.
advertisement
ह्याकरिता एक तडका मोहरी, जिरे आणि कडीपत्त्याचा तयार करून घ्यायचा आहे. ढोकळा तयार झाला की त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर बाहेर काढायचे. तयार केलेली फोडणी टाकून घ्यायची आणि त्याचे काप करून घ्यायचे. तुम्ही हा मटार ढोकळा टोमॅटो केचप किंवा चटणी सोबत खाऊ शकता. तर घरी नक्की ट्राय करा.
advertisement
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 3:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Matar Dhokla Recipe : बेसन ढोकळ्यापेक्षा भारी, घरीच बनवा मटारपासून खास रेसिपी, खाल एकदम आवडीने
title=बेसन ढोकळ्यापेक्षा भारी लागतो हा मटार ढोकळा 








