कंडोम, पिल, कॉपर टीची गरज नाही! हाताला फक्त छोटी स्टिक, 3 वर्षे प्रेग्नन्सीचं टेन्शन नाही; महाराष्ट्रात नवं गर्भनिरोधक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sub Dermal Contraceptive Implant Stick : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधकांमध्ये आता आणखी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. जी फक्त एक छोटी काठी आहे, जी हाताला लावली की प्रेग्नन्सी होणार नाही.
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक म्हणून तसे बरेच पर्याय आहेत. सामान्यपणे आतापर्यंत कंडोम, कॉपर टी, गोळ्या आणि इंजेक्शन याचाच वापर केला जातो. आता यापेक्षा आणखी एक नवा कॉन्ट्रासेप्टिव आला आहे. भारतातील काही राज्यांत नव्या गर्भनिरोधकाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









