मृत्यूनंतर काय होतं? 3 वेळा मृत्यू मग शरीरात परत आला आत्मा, महिलानं सांगितलं अनुभवलेला तो क्षण, ऐकून बसेल धक्का
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नॉर्मा या एकदा किंवा दोनदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा 'क्लिनिकली डेड' होऊन पुन्हा जिवंत झाल्या आहेत. मृत्यूच्या दारातून परतलेल्या नॉर्मा यांनी त्या पलीकडच्या जगाचा जो 'आंखोदेखा हाल' सांगितला आहे,
मुंबई : "माणसाचा मृत्यू झाला की पुढे काय होतं?" हा प्रश्न अनादी काळापासून मानवजातीला छळत आला आहे. स्वर्ग, नरक, आत्मा आणि पुनर्जन्म यावर जगभरात अनेक तर्कवितर्क लावले जातात. विज्ञानासाठी मृत्यू हा शरीराचा अंत असला, तरी काही लोकांसाठी तो एका अद्भूत प्रवासाचा टप्पा असतो. अशाच एका प्रवासाचा थरारक अनुभव घेतला आहे अमेरिकेतील मेरीलँड येथे राहणाऱ्या 80 वर्षीय नॉर्मा एडवर्ड्स (Norma Edwards) यांनी.
नॉर्मा या एकदा किंवा दोनदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा 'क्लिनिकली डेड' होऊन पुन्हा जिवंत झाल्या आहेत. मृत्यूच्या दारातून परतलेल्या नॉर्मा यांनी त्या पलीकडच्या जगाचा जो 'आंखोदेखा हाल' सांगितला आहे, तो वाचून विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्यांनाही धक्का बसेल. त्यांच्या या अनुभवामुळे 'मृत्यू' या संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.
नॉर्मा यांचा मृत्यूशी पहिला सामना झाला तेव्हा त्या फक्त 20 वर्षांच्या होत्या. कामावर जात असताना त्या अचानक कोसळल्या. डॉक्टरांनी तपासले तेव्हा समजले की त्यांच्या शरीरात एक मृत भ्रूण होता, ज्यामुळे त्यांच्या रक्तात विष पसरले होते. नॉर्मा सांगतात, "मी बेशुद्ध झाले आणि क्षणात मला जाणवलं की मी माझ्या शरीरातून बाहेर पडलं आहे. मी छताकडून खाली पाहिलं, तर डॉक्टर्स माझ्या शरीरावर उपचार करत होते. मला अजिबात वेदना होत नव्हत्या."
advertisement
शरीराबाहेर पडल्यानंतर नॉर्मा एका अंधाऱ्या बोगद्यातून प्रकाशाच्या वेगाने धावू लागल्या. शेवटी त्या एका तेजस्वी पांढऱ्या प्रकाशात पोहोचल्या. तिथे त्यांनी एक अवाढव्य 'टेलिव्हिजन स्क्रीन' पाहिली, ज्यावर त्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा सुरू होता. या स्क्रीनवर तीन रकाने (Columns) होते: 1. पहिले आयुष्य: जे पृथ्वीवर येण्यापूर्वी त्यांच्यासाठी 'प्लॅन' केले होते. 2. दुसरे आयुष्य: जे त्यांनी प्रत्यक्षात जगले होते. 3. तिसरे आयुष्य: त्याचे अंतिम रिझल्ट्स.
advertisement
नॉर्मा म्हणतात, "प्रत्येक वेळी स्क्रीनवर एकच वाक्य येत होतं 'मकसद पूर्ण झाला नाही' (Purpose not fulfilled)." तिथे त्यांना त्यांच्या मृत काकू भेटल्या, ज्यांनी निरोप दिला की 'जीवन हे शाश्वत आहे आणि मृत्यू हा अंत नाही'.
पुन्हा शरीरात परत येण्याचा अनुभव नॉर्मा यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक होता. त्या म्हणतात, "हे म्हणजे एखाद्या विशाल आकाशगंगेला एका छोट्या चहाच्या पेल्यात कोंबण्यासारखं होतं. माझा आत्मा खूप विशाल होता, त्याला पुन्हा त्या छोट्या शरीरात ढकलणं खूप कठीण आणि त्रासदायक होतं." या अनुभवानंतर त्यांच्यामध्ये काही विचित्र बदल झाले त्यांना लोकांच्या शरीराच्या आतलं दिसू लागलं आणि बल्ब त्यांच्या जवळ येताच फुटू लागले.
advertisement
दुसरा आणि तिसरा मृत्यू: फरिश्त्याचा संदेश
नॉर्मा यांचा मृत्यूशी दुसरा आणि तिसरा सामना नोव्हेंबर 2024 मध्ये झाला, जेव्हा त्यांना कार्डियक अरेस्ट आला. रुग्णवाहिकेत नेताना त्या पुन्हा मृत झाल्या. या वेळी एका महिला देवदूताने त्यांचे मार्गदर्शन केले. त्यांना पुन्हा तोच संदेश मिळाला की, "तुझे अर्धे मिशन अजून बाकी आहे, लोकांना मृत्यूच्या भीतीतून मुक्त करण्यासाठी तुला परत जावे लागेल."
advertisement
आज 80 वर्षांच्या नॉर्मा एडवर्ड्स वृद्ध आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांसाठी काम करतात. त्या त्यांना एकच गोष्ट समजावून सांगतात की, मृत्यूला घाबरण्याची गरज नाही. नॉर्मा म्हणतात, "मी मृत्यूला घाबरत नाही, कारण मला माहित आहे की ही शेवटची नाही, तर एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे. जोपर्यंत तुमच्याकडे श्वास आहे, तोपर्यंत तुमच्याकडे जगातील सर्वात मोठी भेट आहे."
advertisement
नॉर्मा एडवर्ड्स यांची कहाणी आपल्याला आठवण करून देते की, जीवनाचे एक मोठे उद्दिष्ट असते. मृत्यू हे कदाचित एक दार आहे जे दुसऱ्या विश्वात उघडते. विज्ञान याला 'ब्रेन ॲक्टिव्हिटी' म्हणेल, पण ज्यांनी हे अनुभवलंय त्यांच्यासाठी हे सत्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 3:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मृत्यूनंतर काय होतं? 3 वेळा मृत्यू मग शरीरात परत आला आत्मा, महिलानं सांगितलं अनुभवलेला तो क्षण, ऐकून बसेल धक्का









