राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधातही न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.
advertisement
राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसेच अन्य आरोपी उपस्थित राहिले. तर नितेश राणे यांच्यासह अन्य पाच जण गैरहजर होते.
न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारत अटक वॉरंट जारी केले. मात्र नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याच्या प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.
