लातूर तालुक्यातील लातूर औसा महामार्गावरील पेठ शिवारात ही घटना घडली आहे. पेठ शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या शेड मध्ये या जोडप्याने गळफास लावून आत्म्यहत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन दराडे आणि राणी दराडे अशी या जोडप्याची नाव आहे. नितीन दराडे हा लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथे एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता आणि तो शारीरिक दृष्ट्या अपंग होता. तर राणी दराडे ही लातूरच्या एमआयटी मेडिकल कॉलेज मध्ये नर्स होती.या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.हे दोघेही बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी गावातील रहिवाशी आहेत. दोन्ही मृत हे एकाच भावकीतील असल्याने या दोघांच्या प्रेम संबंधाला विरोध होता.त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
advertisement
खरं तर जोडप्याला भावकीचाही विरोध होता आणि घरच्यांचाही विरोध होत होता.त्यामुळे आपण एकमेकांचे होऊ शकणार नाही,म्हणून दोघांनी लातूर शहरापासून 4 किलोमीटर वर असलेल्या पेठ गावच्या शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने दराडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.