लातूरच्या गंजगोलाई परिसरात फेमस हॉटेल आणि माशा अल्ला हॉटेल शेजारी शेजारीच आहेत. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकाने कार पार्किंग केल्यावरून माशाअल्ला हॉटेलचे मालक आणि इतरांनी फेमस हॉटेलचे मालक फैयाज अब्दुल कदिर अत्तार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला तर आणखी एकाला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात दोन जण जखमी झाले आहेत.
आमच्या हॉटेल पुढे वारंवार पार्किंग केली जाते, असे म्हणत हाणामारी झाली आहे. याप्रकरणी लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात माशा अल्ला हॉटेलचा मालक अरबाज इस्माईल कुरेशी, शहाबाज इस्माईल कुरेशी, रेहान कुरेशी आणि अरबाज कयूम शेख अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
advertisement
तसेच आरोपींना पोलिसांकडून नोटीसही देण्यात आली आहे. दिवसाढवळ्या दोन व्यवसायिकांमध्ये पार्किंगवरून खुलेआम कोयत्याने हल्ला होत असल्यामुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे.