TRENDING:

Latur Crime : लॉजवर BF सोबत प्लॅनिंग, पण एक चूक केली; पोलिसांना तिथंच संशय आला अन् 'खेळ खल्लास'

Last Updated:

Latur Crime Wife plan to finished Husband : शुक्रवारी दुपारी अविनाश लातुरात आला आणि म्हाडा कॉलनीच्या कमानीजवळ दबा धरून बसला. रात्री 9 वाजेच्या सुमारास सचिन सुर्यवंशी कमानीजवळ आला अन्...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Latur Crime News : प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात. पण प्रेमात प्रेयसीच्या नवऱ्यावर हल्ला करणं एका तरुणाला महागात पडलंय. लातूरमध्ये पती छळ करतोय असे प्रेयसीच्या सांगण्यावरून 29 वर्षीय प्रियकराने तिच्या नवऱ्याचा खून करण्याच्या उद्देशाने कत्तीने वार केल्याची घटना, शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास लातूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या गेटवर घडली आहे. यात प्रेयसीचा पती गंभीर जखमी झाला. भक्ती आणि अविनाश यांचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती सचिनला या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली होती. सचिन मजुरीला बाहेर जाताना पत्नी भक्तीला घरात बंद करून कडी लावत असे, ज्यामुळे भक्ती वैतागली होती. भक्तीने प्रियकर अविनाशला पती सचिनचा छळ होत असल्याचे सांगून त्याला संपवण्यास सांगितल्याचे पोलिस म्हणाले.
Latur Crime Husband locked Wife
Latur Crime Husband locked Wife
advertisement

चेहऱ्यावर आणि छातीत कत्तीने वार

सचिनवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मानेवर, आरोपी अविनाश चेहऱ्यावर आणि छातीत कत्तीने गंभीर वार झाल्यामुळे त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. विवेकानंद चौक पोलिसांनी हल्लेखोर संशयीत सचिन सूर्यवंशी आणि त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे.

कमानीजवळ येताच अविनाशवर वार

advertisement

शुक्रवारी दुपारी अविनाश लातुरात आला आणि म्हाडा कॉलनीच्या कमानीजवळ दबा धरून बसला. रात्री ९ वाजेच्या सुमारास सचिन सुर्यवंशी कमानीजवळ येताच अविनाशने त्याच्यावर कत्तीने गंभीर वार केले. मानेवर, चेहऱ्यावर आणि छातीत वर्मी वार लागल्यामुळे सचिन जागेवरच कोसळला.

लॉजमध्ये प्लॅनिंग

सचिन सूर्यवंशी याच्यावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानेवर, चेहऱ्यावर आणि छातीत गंभीर वार झाल्यामुळे त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. विवेकानंद चौक पोलिसांनी हल्लेखोर प्रियकर अविनाश आणि त्याची प्रेयसी भक्ती या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांनी लॉजमध्ये प्लॅन केल्याचे उघड झाले.

advertisement

जबाब देताना पत्नी अडखळली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

दरम्यान, रात्री 10 वाजेच्या सुमारास विवेकानंद चौक पोलिसांना फोन आला एक जखमी रस्त्यात पडलेला आहे. पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याच्या पत्नीला ताब्यात घेत चौकशी केली असत ती अडखळत असल्याचे लक्षात आले. अधीक चौकशी करताच तिने आरोपीचे नाव सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur Crime : लॉजवर BF सोबत प्लॅनिंग, पण एक चूक केली; पोलिसांना तिथंच संशय आला अन् 'खेळ खल्लास'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल