TRENDING:

फ्रेशर्स पार्टीतला डान्स जीवावर बेतला, लातूरमध्ये कॉलेज तरुणाची थरारक हत्या, नक्की काय घडलं?

Last Updated:

Crime in Latur: फ्रेशर्स पार्टीत केलेला डान्स एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. डान्स करताना घडलेल्या किरकोळ कारणातून एका कॉलेजच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Crime in Latur: मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वेगाने वाढताना दिसत आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरून थेट हत्येचे प्रकार घडत आहेत. आता पुन्हा एकदा किरकोळ कारणातून एका कॉलेजच्या तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. फ्रेशर्स पार्टीत डान्स करत असताना धक्का लागल्याच्या कारणातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यातच तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

ही घटना लातूर येथील जीवनरेखा महाविद्यालयात घडली. सुरज धोंडीराम शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो लातूर शहरातील जीवनरेखा महाविद्यालयात डीएमएलटीचं शिक्षण घेत होता. अलीकडेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी 'फ्रेशर्स पार्टी'चे आयोजन केले होते. याच पार्टीत सुरज धोंडीराम शिंदे (रा. प्रगती नगर, लातूर) सहभागी झाला होता. पण ही पार्टी सुरजची अखेरची पार्टी ठरली.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

फ्रेशर्स पार्टीत डान्स करत असताना मयत सूरज आणि आरोपींचा एकमेकांना धक्का लागला. यावरून दोन गटात वाद सुरू झाला. याचवेळी रिहान शेख आणि इरफान पठाण (दोघेही रा. चौधरी नगर, लातूर) आणि त्यांच्यासोबत असलेले इतर दोघेजण यांनी जुन्या वादाची कुरापत काढून सुरज शिंदे आणि त्याच्या मित्राला काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सुरज शिंदे गंभीररित्या जखमी झाला. मारहाणीमुळे तो कोमामध्ये गेला होता.

advertisement

उपचारादरम्यान मृत्यू

सुरजवर लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. कॉलेजची फ्रेशर्स पार्टी ही त्याच्या आयुष्यातील अखेरची पार्टी ठरली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चौघांवर गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

या प्रकरणी सुरजचा मित्र आदित्य याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रिहान शेख आणि इरफान पठाण यांच्यासह इतर दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून अशी गंभीर हाणामारीची घटना घडल्याने कॉलेज प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
फ्रेशर्स पार्टीतला डान्स जीवावर बेतला, लातूरमध्ये कॉलेज तरुणाची थरारक हत्या, नक्की काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल