गुजरात पोलिसांकडून कासलेला अटक
गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडी प्रकरणी अटक असलेल्या आरोपींकडून रणजीत कासले यांच्याबाबत माहिती मिळाली. या आरोपींना मदत केल्याचा आरोप रणजीत कासलेवर आहे. अशातच आता महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये रणजीता कासले याला घेऊन जाण्यात येईल. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कागदपत्राची पूर्तता करून सहा जणांच्या पथकाने रणजीत कासले यास गुजरात नेण्यात येईल.
advertisement
मंत्र्यांवर थेट आरोप
महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकरणी आत्तापर्यंत सात गुन्हा रणजीत कासले याच्यावर दाखल आहेत. बडतर्फ झाल्यानंतर रणजीत कासले याने मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हिडीओ करत अनेक खुलासे केले आहेत. कासले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांवर थेट आरोप केले होते.
पुष्पाची ॲक्शन
लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातून रणजीत कासले याला अटक करण्यात आली असून याची नोंद गुजरात पोलिसांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे. यावेळी त्याला गुजरात पोलिस घेऊन जाताना ' बॉसला अटक झाली म्हणत पुष्पा ची ॲक्शन ही करून दाखविली. गेल्या काही दिवसांपासून गुजरात पोलिसांचे ५ ते ६ जणांचे पथक रणजीत कासले याचा लातूरमध्ये शोध घेत होते. अखेर त्याला रात्री अटक करून गुजरात राज्यातील सुरत येथे घेऊन जाण्यात आले.
रणजीत कासले कोण आहे?
रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर काही गंभीर आरोप झाले होते. त्यांच्यावर वरिष्ठांची परवानगी न घेता सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी परराज्यात गेल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. एवढेच नाही, तर परराज्यात असताना त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाण-घेवाण केली, असाही त्यांच्यावर आरोप होता. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान परळी येथे कार्यरत असताना, त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गाड्या पकडून पैशांच्या पेट्या जप्त केल्या होत्या. याव्यतिरिक्त, त्यांनी वाल्मिक कराड याला फिल्म प्रोड्युसर असल्याचे सांगून, मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटोही पोस्ट केले होते. या सर्वानंतर, वाल्मिक कराड यांच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा देखील कासले यांनी केला होता.