मक्याच्या दरात सुधारणा: राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 9 हजार 911 क्विंटल मक्याची एकूण आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 2000 क्विंटल लाल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1160 ते जास्तीत जास्त 1651 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल लाल मक्यास 2075 ते 2300 रुपये दरम्यान भाव मिळाला.
advertisement
कांदा आवकेत उच्चांक मात्र दरात घट: राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 20 हजार 735 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 41 हजार 424 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 420 ते जास्तीत जास्त 1496 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1201 क्विंटल पांढर्या कांद्यास प्रतीनुसार कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 3200 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला.
सोयाबीन आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 89 हजार 048 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी अमरावती मार्केटमध्ये सर्वाधिक 20 हजार 115 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3650 ते 4100 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच लातूर मार्केटमध्ये 434 क्विंटल पांढर्या सोयाबीनची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 4300 ते 4600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.