अशी राहिली मका आवक: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 26 हजार 207 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी धुळे मार्केटमध्ये 8 हजार 535 क्विंटल सर्वाधिक मका आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1150 ते जास्तीत जास्त 1351 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 हजार 509 क्विंटल मक्यास 1351 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख, 4 हजार 845 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख, 16 हजार 027 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 310 ते जास्तीत जास्त 1370 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 760 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1400 ते 2700 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये 100 क्विंटल कांद्यांची आवक होवून त्यास 14 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजार भाव मिळाला.
सोयाबीन उत्पादकांची कोंडी: राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची 1 लाख, 11 हजार 208 क्विंटल एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 31 हजार 600 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3545 ते 4183 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच बुलढाणा मार्केटमध्ये आवक झालेल्या 590 क्विंटल सोयाबीनला 3300 ते 4295 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला.
यंदाच्या अतिवृष्टीतून पिके वाचवणे अगदी कठीण होते. अशा स्थितीत देखील शेतकऱ्यांनी पिके काही प्रमाणात वाचवली आहेत. रब्बीची तयारी आणि दिवाळी सारखा सण तोंडावर असताना वाचवलेली पिके शेतकरी मार्केटमध्ये पोहचवत आहेत. मात्र पिकांचे दर गडगडलेले असल्याने खरीप वाचवणारे शेतकरी अडचणीत कायम आहेत.