TRENDING:

HSC Result 2025 Live Update: विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी, बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर

Last Updated:

Maharashtra 12th board result 2025: बोर्डानं बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी आणि पालकांना हा निकाल दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे. तुम्ही हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. यंदाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी लागला आहे. दरवर्षीप्रमाणे कोकण अव्वल ठरलं, आणि मुलींचा निकाल सर्वात जास्त आला आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने याबाबत घोषणा केली. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. निकाल mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल तपासता येणार आहे. या निकालासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथे पाहाता येतील.
News18
News18
advertisement
May 05, 202512:52 PM IST

12th Result 2025 Live Update: पुढच्या काही मिनिटांत मोबाईलवर येणार निकाल

विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली पुढच्या काही मिनिटांत येणार निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार
May 05, 202511:31 AM IST

12th Result 2025 Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल थेट पाहा न्यूज 18 मराठीवर

बारावीच्या परीक्षेचा निकाल थेट पाहा न्यूज 18 मराठीवर
May 05, 202511:27 AM IST

HSC Result 2025: बारावीच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
advertisement
May 05, 202511:20 AM IST

लातूर पॅटर्न मागे पडला, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकाल कमी लागला

कोकण विभाग सर्वात अधिक तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल ५४ पैकी ३७ विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे गेल्या वर्षी पेक्षा १.४९ टक्क्यांनी कमी निकाल लागला आहे कोकण विभाग अव्वल
May 05, 202511:19 AM IST

HSC Result 2025: कोकणची बाजी, तर लातूर पॅटर्नची घसरगुंडी

यंदा बारावीचा निकाल 91.88 टक्के, 13 लाख 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे ९१.३२ नागपूर ९०.५२ छत्रपती संभाजीनगर ९२.२४ मुंबई ९२.९३ कोल्हापूर ९३.६४ अमरावती ९१.४३ नाशिक ९१.३१ लातूर ८९.४६ कोकण ९६.७४
May 05, 202511:12 AM IST

HSC Result 2025 Live Update: गैरप्रकार झालेल्या केंद्रांवर कठोर कारवाई

३३७३ केंद्रावर परीक्षा झाली, त्यापैकी काही केंद्राची चौकशी सुरू
गैरमार्ग प्रकरणं होतील त्या केंद्रावरील मान्यता कायमची रद्द होणार आहे
पुढील परीक्षेपासून ती केंद्र कायमची बंद होतील
जी केंद्र गैरमार्ग आढळली आहेत त्यांची सध्या चौकशी सुरू आहेत
advertisement
May 05, 202511:07 AM IST

HSC Result 2025; गुणपडताळणीसाठी 20 मेपर्यंत अर्ज करता येणार

गुणपडताळणीसाठी 20 मेपर्यंत अर्ज करता येणार
May 05, 202511:06 AM IST

HSC Result 2025 Live Update: बोर्डाची पत्रकार परिषद सुरू 

बोर्डाची पत्रकार परिषद सुरू बारावीचा निकाल जाहीर दुपारी 1 वाजता विद्यार्थी आणि पालकांना पाहता येणार
May 05, 20258:13 AM IST

HSC Result 2025 Live Update: ग्रेडिंग सिस्टिम कशी असणार?

ग्रेडिंग सिस्टीमनुसार, ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार
६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी
४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी
उत्तीर्ण होण्यासाठी ३५ पेक्षा जास्त गुण हवे.
advertisement
May 05, 20257:56 AM IST

HSC Result 2025: विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं होणार?

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक
विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील
ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.
May 05, 20257:52 AM IST

12 th Result 2025: कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल?

बारावीचा निकाल पाहण्यासाठी या वेबसाईट आहेत. mahresult.nic.in
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
https://hscresult.mkcl.org/
May 05, 20257:47 AM IST

HSC Result 2025 : किती विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा?

परीक्षेसाठी सुमारे ८.१ लाख विद्यार्थी, ६.९ लाख विद्यार्थिनी आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती.
advertisement
May 05, 20257:44 AM IST

HSC Result 2025 Live Update: बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट

बारावीचा निकाल mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार
बोर्डाच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.
त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेण्यात आल्या होत्या.
May 05, 20257:43 AM IST

Maharashtra HSC Result 2025: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार दुपारी 1 नंतर ऑनलाईन पाहता येणार निकाल
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
HSC Result 2025 Live Update: विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी, बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल