TRENDING:

Maharashtra Cabinet: आरोग्य विभागाच्या त्या २९१ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यासंदर्भात कॅबिनेटचा मोठा निर्णय

Last Updated:

Cabinet Meeting Decision: आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
Cabinet Meeting
Cabinet Meeting
advertisement

या निर्णयानुसार जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य सेवक (महिला) यांची पदे ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित संचालक, आरोग्य सेवा संचालनालयामार्फत शासकीय परिचर्या महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांमधून २ वर्षाच्या कालावधीसाठी भरण्यात येत असत. हा कालावधी संपल्यानंतर या उमेदवारांना कार्यमुक्त केले जात असे.

त्यानंतर संबंधित जिल्ह्यातील रुग्णसेवेची निकड व जिल्ह्यातील रिक्त पदांची स्थिती लक्षात घेता त्यांना अकरा महिन्यांची अस्थायी नियुक्ती देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना होते. विभागीय आयुक्तांचा हा अधिकार सन २०१८ मध्ये रद्द करण्यात आला होता.

advertisement

सेवानिवृत्त झालेल्या व सध्या कार्यरत २९१ बंधपत्रित आरोग्य सेविकांना सेवा नियमित करणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुंबईतलं असं ठिकाणं वाटेल गोव्यात आल्यासारखं! ख्रिसमसला अख्खं गाव सजतं!
सर्व पहा

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागात १५ एप्रिल २०१५ पूर्वी नियुक्त झालेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या व सध्या कार्यरत अशा २९१ बंधपत्रित आरोग्य सेविका यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचे अधिकार विभागीय आयुक्त यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet: आरोग्य विभागाच्या त्या २९१ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यासंदर्भात कॅबिनेटचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल