TRENDING:

Grampanchayat Election: गावाचा 'कारभारी' तोच राहणार! १४ हजार ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मास्टरस्ट्रोक

Last Updated:

Grampanchayat Election : २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करायची, यावर राज्य सरकारने शनिवारी शिक्कामोर्तब केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करायची, यावर राज्य सरकारने शनिवारी शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे, आता बाहेरचा कोणताही अधिकारी प्रशासक म्हणून येणार नसून, विद्यमान सरपंचांकडेच प्रशासकपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
गावाचा 'कारभारी' तोच राहणार! १४ हजार ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मास्टरस्ट्रोक
गावाचा 'कारभारी' तोच राहणार! १४ हजार ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मास्टरस्ट्रोक
advertisement

प्रशासकीय पोकळी दूर करण्यासाठी निर्णय...

प्रशासनात पोकळी निर्माण होऊ नये म्हणून निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील हजारो ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे. इतक्या मोठ्या संख्येने विस्तार अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रशासकीय कामात अडचणी येण्याची शक्यता होती. गावातील विकासकामे थांबू नयेत आणि प्रशासनात सातत्य राहावे, यासाठी सरकारने हा सुधारित निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी ग्रामपंचायतीची मुदत संपेल, त्या दिवसापर्यंत जे सरपंच पदावर असतील, त्यांनाच 'प्रशासक' म्हणून नियुक्त केले जाईल. यामुळे आता गावचा कारभार आता सरपंचांच्या हाती राहणार असून कारभारी बदलणार नाही.

advertisement

अशी असेल प्रशासकीय समिती

केवळ सरपंचच नाही, तर त्यांच्या सोबतीला विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची एक 'प्रशासकीय समिती' स्थापन केली जाणार आहे. या समितीला मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अधिकार प्रदान करतील. हा कालावधी नियुक्तीपासून ६ महिने किंवा निवडणुका होईपर्यंत (जे आधी असेल ते) राहणार आहे.

अकोल्याच्या सरपंचांच्या याचिकेचा परिणाम

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

या निर्णयाला गती मिळण्यामागे अकोल्यातील हिंगणी बुद्रुक गावच्या सरपंच डॉ. कल्पना पळसपगार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका कारणीभूत ठरली. या याचिकेमुळे सरकारला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली आणि सरपंचांना दिलासा मिळाला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Grampanchayat Election: गावाचा 'कारभारी' तोच राहणार! १४ हजार ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मास्टरस्ट्रोक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल