TRENDING:

Medical Officer Bharti 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात १४४० जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Last Updated:

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. राज्यातल्या डॉक्टर असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डॉक्टर तरूणांसाठी राज्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. राज्यातल्या डॉक्टर असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मेडिकल ऑफिसर पदासाठी ही भरती होत असून ऑनलाईन पद्धतीने इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये नेमकी किती पदासाठी नोकरभरती होत आहे, याची पात्रता काय? यासह इतरत्र माहितीही जाणून घेऊया...
maharashtra medical officer recruitment 2026 apply for 1440 posts in health department
maharashtra medical officer recruitment 2026 apply for 1440 posts in health department
advertisement

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी 1440 पदांसाठी नोकरभरती होणार आहे. ही नोकरभरती मोठ्या संख्येने केली जात असून फार मोठ्या कालावधीनंतर आरोग्य विभागामध्ये राज्यातल्या तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. 'वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS' आणि 'वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-विशेषज्ञ' अशा दोन वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जात आहे. एकूण 1440 रिक्त पदांसाठीही भरती केली जाणार आहे.

advertisement

'वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS' पदासाठी MBBS ची पदवी असणे अनिवार्य असणार आहे. 'वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-विशेषज्ञ' पदासाठी वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा समतुल्य अशा शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. 18 ते 38 वयोगटातील उमेदवार या नोकर भरतीसाठी पात्र होणार आहेत. नोकरभरतीमध्ये इतर मागासवर्गीय उमेदवारांना आणि आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना 5 वर्षांसाठी वयोमर्यादेत सूट दिली आहे. इतर सर्व उमेदवारांना 18 ते 38 हिच वयोमर्यादा असेल.

advertisement

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रूपये इतका परिक्षा शुल्क असणार आहे. तर, इतर मागासवर्गीय उमेदवार, आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवार, अनाथ उमेदवार, दिव्यांग उमेदवार, महिला उमेदवार आणि खेळाडू यांना 700 रूपये इतके परिक्षा शुल्क असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज प्रक्रिया करायची असून ऑनलाईन पद्धतीने परिक्षा शुल्क उमेदवारांना भरावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे.

advertisement

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी एकदा व्यवस्थित जाहिरात वाचूनच अर्जदारांनी आपला अर्ज भरायचा आहे.

जाहिरातीच्या PDF ची लिंक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Medical Officer Bharti 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात १४४० जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल