TRENDING:

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Live : नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान संपलं, पण अजूनही ठिकठिकाणी रांगा

Last Updated:

Local Body Elections: - राज्यभरात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं. पण कुठे मारामारी तर कुठे दगडफेकीच्या घटनांमुळे मतदानाला गालबोट लागलं. तर दुसरीकडे आज मतदान पार पडलं असलं तरी न्यायालयाच्या आदेशानुसार, मतमोजणी ही २१ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nagar Parishad Election/ Nagar Panchayat Election Live Update:  राज्यातल्या 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं आहे. काही ठिकाणी बोगस मतदार तर कुठे पैशांच्या वाटप झाल्याचे धक्कादायक प्रकारही घडले. बोगस मतदारामुळे अनेक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांमध्ये राडा पाहण्यास मिळाला. तर काही ठिकाणी दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच नगर परिषद निवडणुकीला गालबोट लागलं आहे. तर दुसरीकडे, मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी पार पडली. या सुनावणीत २१ डिसेंबरला मतमोजणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आज मतदान झालं असलं तरी मतमोजणी ही २१ डिसेंबरला होणार आहे.
नगर परिषद निवडणुकीची उद्या मतमोजणी नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय
नगर परिषद निवडणुकीची उद्या मतमोजणी नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय
advertisement
Dec 02, 20256:43 PM IST

हिंगोलीत क्रमांक 15 मध्ये मतदारांची अजूनही रांग,मतदानाची नियोजित वेळ संपल्यानंतरही मतदार रांगेत

हिंगोली शहरात नगरपरिषद निवडणुक मतदानाची नियोजित वेळ संपल्यानंतरही प्रभाग क्रमांक 15 मधील मतदान केंद्रावर मतदारांची लांब रांग आहे. सकाळपासूनच मतदारांनी या मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संध्याकाळच्या वेळी 15 क्रमांक प्रभागातील या मतदान केंद्रावर गर्दी वाढल्याने अजूनही मतदारांची बुथवर रांग आहे. मतदान पूर्ण व्हायला साधारण सात ते साडे सात वाजण्याची शक्यता आहे.
Dec 02, 20256:42 PM IST

जव्हारमध्ये रात्री ९ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार

जव्हार नगरपरिषदेत दुपारी 3:30 वाजल्या नंतर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती संध्याकाळी5: 30पर्यंत मतदान केंद्रात मतदारांच्या रागा लागल्या होत्या. मतदान केंद्राचे गेट लावून मतदारांना क्रमवारीने चिठ्ठ्या देण्यात आल्या आहेत तर काही मतदार मांडी घालून बसलेले आहेत. प्रभाग 4 मध्ये 74
प्रभाग 2 मध्ये 231
प्रभाग 5मध्ये 80
प्रभाग 8 मध्ये 228
प्रभाग 9 मध्ये 74
अजुन 6: 30झाले तरी मतदान सुरू आहे.
जवळपास 8 ते 9 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील असा अंदाज आहे.
Dec 02, 20256:37 PM IST

मतदान संपल्यानंतरही ठिकठिकाणी रांगा

मतदानाची वेळ संपल्या नंतरही नांदेडच्या मुदखेड मध्ये मतदानासाठी मतदारांच्या मतदान केंद्रा बाहेर रांगा. मुदखेड शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मतदानासाठी मतदारांच्या रांगा. नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि एका नगर पंचायतीसाठी आज मतदान.
advertisement
Dec 02, 20254:36 PM IST

चाळीसगावात बोगस मतदाराला पकडलं, भाजपकडूनच बनावट प्रमाणपत्र देऊन लोकशाहीची हत्या - उन्मेष पाटील

चाळीसगाव शहरात महाविकास आघाडीने बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. भाजप बनावट ओळखपत्राच्या आधारावर बोगस मतदान करून लोकशाहीची हत्या करत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून लोकशाहीची हत्या करत आहे. पोलीस उघड्या डोळ्यांनी बघताय हे दुर्दैव आहे पोलीस प्रशासनाच्या हातचे बाहुले बनले आहे. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटलांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
Dec 02, 202511:11 AM IST

नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिकेसाठी दोन तासात सरासरी 7. 69 टक्के सरासरी मतदान

1. देगलूर – 8.89%
2. बिलोली – 9.09%
3. कुंडलवाडी – 8.62%
4. उमरी – 5.31%
5. मुदखेड – 7.41%
6. भोकर – 6.88%
7. हिमायतनगर – 11.87%
8. किनवट – 5.61%
9. हदगाव – 5.60%
10. लोहा – 7.92%
11. कंधार – 7.36%
Dec 02, 202510:07 AM IST

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मध्ये एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन एक तासापासून बंद

नगरपालिका हद्दीमधील शहीद अब्दुल हमीद उर्दू उच्च प्राथमिक शाळा बाबळी या ठिकाणी मतदान होत असून खोली क्रमांक १ मधील गेल्या एक तासांपासून मतदान मशीन बंद असल्याने मतदान मध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश पाहायला मिळत आहे. 27 मतदान झाल्यानंतर तब्बल वाजता पासून हे मशीन बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक विभागाच्या वतीने मशीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे .
advertisement
Dec 02, 20259:59 AM IST

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Live : वर्ध्यात निवडणूक प्रक्रियेतील घोळ कायम

– वर्ध्यात निवडणूक प्रक्रियेतील घोळ कायम
– कर्मचाऱ्याने मतदाराच्या बोटाला लावली नाही शाई
– कर्मचारी गोष्टीत गुंग असल्यानं घडला प्रकार
– मतदार विजय उपशाम या मतदाराने केलं मतदान
– केसरीमल कन्या शाळा,रूम नंबर एक मधील प्रकार
– निवडणूक प्रक्रियेतील प्रकाराने मतदार उपशाम यांनी नोंदविला आक्षेप
Dec 02, 20259:59 AM IST

चोपडा नगर परिषद निवडणुकीच्या भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साधना चौधरी यांनी बजावला कुटुंबासह मतदानाचा हक्क.

चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साधना चौधरी यांनी माजी नगराध्यक्ष मनीषा चौधरी माजी नगरपरिषदेचे गटनेते जीवन चौधरी असे कुटुंबासह महात्मा गांधी विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला यावेळेस त्यांनी मतदारांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन केले.
Dec 02, 20259:22 AM IST

बुलढाण्यातील नांदुरा येथे देखील मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

बुलढाण्यातील नांदुरा नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया आज होणार आहे.. मात्र मतदानाच्या एक दिवस आधी रात्रीच प्रभाग क्रमांक दहामधील अपक्ष उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
Dec 02, 20259:17 AM IST

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Live : नाशिकमध्ये उमेदवाराचंच नाव सापडत नसल्यानं गोंधळ

नाशिकमध्ये उमेदवाराचंच नाव सापडत नसल्यानं गोंधळ
भागूर नगरपरिषद निवडणूक मतदानादरम्यानचा प्रकार
शिवसेनेच्या शांता गायकवाडांचं नावच सापडत नसल्यानं गोंधळ
नाशिक
उमेदवाराचे नावंच सापडत नसल्याने गोंधळ
भागुरच्या नगरपरिषद निवडणुकी दरम्यान उमेदवाराचेच नाव नसल्याने गोंधळ
शिवसेनेच्या शांता गायकवाड यांचे नावच सापडत नसल्याने गोंधळ
Dec 02, 20258:44 AM IST

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Live : अजितदादांच्या बीडमध्ये पैसे वाटप?

बीडमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री दुचाकीमध्ये सापडे पैसे आणि शस्त्र, परिसरात उडाली खळबळ, अजितदादांच्या बीडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून प्रतिक्रिया दिली. तरुणांना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम आढळलेली नाही. रात्री आम्ही केवळ काही लोकांकडून चाकू ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रमुख खेडकर यांनी फोनवरून बोलताना दिली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Dec 02, 20258:42 AM IST

Election Live : भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या डॉक्टर ज्योती घुंबरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

बीड नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाच्या डॉक्टर ज्योती घुंबरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. बीड करांनी सर्वांनी उत्स्फूर्त मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच बिडकर जनता विजय करेल असा विश्वास व्यक्त केला.
advertisement
Dec 02, 20258:38 AM IST

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Live : रायगड, सातारा पाठोपाठ आता सोलापुरातही EVM बंद

राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळी सकाळी EVM बंद पडल्याच्या घटना घडल्या. कणकवली, सोलापूर, सातारा अशा अनेक ठिकाणी EVM मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
Dec 02, 20258:08 AM IST

Nagar Parishad-Nagar Panchayat Election: वर्ध्यामध्ये अर्धा तास उशिराने मतदान, कारण आलं समोर

वर्ध्यात मतदान प्रक्रियेच्या वेळेवरून गोंधळ, वेळेत मतदानाला सुरुवात न झाल्यान मतदारात नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल अर्धा तासाचा फरक पडल्यानं मतदार राहिले ताटकळत होते. प्रशासनाकडून सात वाजताची वेळ दिली होती मात्र त्या वेळेत मतदान सुरू झालं नाही.  सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू न होता सुरू झाली साडे सातला वर्ध्यातील सर्वच मतदान केंद्रावरील प्रकार
Dec 02, 20258:06 AM IST

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Live : रायगड आणि साताऱ्यामध्ये EVM मशीन बंद

साताऱ्यातील आझाद मैदान कॉलेज परिसरात EVM मशीन बंद, तर रायगडमध्ये देखील EVM मशीन बंद झाल्याने मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण होतं. तांत्रिक बिघाड झाल्याने EVM मशीन बंद असल्याची माहिती मिळाली आहे. हे EVM बदलण्याची प्रक्रिया सुरू असून थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल. मतदानाला उशीर झाल्याने गोंधळ
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Parishad-Nagar Panchayat Election Live : नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान संपलं, पण अजूनही ठिकठिकाणी रांगा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल