राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून विशेष करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात दुसऱ्यांदा दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
कुठून कुठे बदली?
१. डॉ. सुहास दिवसे (IAS:SCS:२००९) कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांची यशदा, पुणे येथे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
२. शैलेश नवाल (IAS:RR:२०१०) केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आलेले आणि सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
-सुहास दिवसे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन सरकारने त्यांच्याकडे भूमी अभिलेखच्या संचालकपदाची जबाबदारी दिली.
-शैलेश नवाल हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्यावर आता भूमी अभिलेखच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या
राजेश नार्वेकर (IAS:SCS: 2009 ) यांची मुंबई येथील परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
समीर कुरतकोटी (IAS:SCS:2013) यांची मुंबई येथील शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
