TRENDING:

ZP Election EVM: निवडणूक केंद्रावर राडा! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने ईव्हीएम फोडलं, कारण काय?

Last Updated:

ZP Election Kolhapur: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत भुदरगड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत भुदरगड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाधवडे येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असतानाच थेट ईव्हीएम (EVM) मशीन जमिनीवर आपटून फोडून टाकले. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या या कृत्यामुळे मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
निवडणूक केंद्रावर राडा! बॅलेट पेपरची मागणी करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने ईव्हीएम फोडलं
निवडणूक केंद्रावर राडा! बॅलेट पेपरची मागणी करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने ईव्हीएम फोडलं
advertisement

नेमकी घटना काय?

भुदरगड तालुक्यातील नाधवडे येथे शनिवारी दुपारी मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू होती. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिवसेना (ठाकरे गट) ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे हे मतदानासाठी केंद्रात आले. त्यांनी मतदान केल्यानंतर अचानक ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर जोरात आपटले. मशिन फुटल्याने आणि गोंधळ झाल्याने मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला.

'बॅलेट पेपर'साठी टोकाचे पाऊल

advertisement

निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी जयवंत वायदंडे यांची मागणी होती. या मागणीसाठी त्यांनी शासन आणि निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, वायदंडे यांनी यापूर्वीच सोशल मीडियावर निवडणूक प्रक्रियेविरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या होत्या. ईव्हीएम फोडल्या प्रकरणी जयवंत वायदंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

advertisement

पोलिसांची कारवाई आणि मतदान पुन्हा सुरू

ईव्हीएम फोडल्याची घटना घडताच केंद्रावरील पोलीस कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी सतर्क झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी तत्काळ वायदंडे यांना ताब्यात घेतले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर निवडणूक विभागाने पर्यायी व्यवस्था करून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू केली.

advertisement

निवडणुकीची आकडेवारी आणि निकाल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात एकूण ७४.३५ टक्के इतके भरघोस मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP Election EVM: निवडणूक केंद्रावर राडा! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने ईव्हीएम फोडलं, कारण काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल