TRENDING:

रत्नागिरी ZP-PS निकाल 2026 LIVE | शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेनेत तगडी लढत, कोण मारणार बाजी?

Last Updated:

Ratnagiri ZP Election 2026 : कोकणच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचा माहोल कोकणात तापल्याचे पाहायला मिळाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रत्नागिरी : कोकणच्या राजकारणात निर्णायक ठरणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज, ९ फेब्रुवारी रोजी जाहीर होत आहे. विशेष म्हणजे, यंदाची निवडणूक शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना यांच्यातील थेट संघर्षामुळे अधिकच लक्षवेधी ठरली.
Maharashtra ZP PS Election 2026
Maharashtra ZP PS Election 2026
advertisement

निकालाचे ताजे अपडेट

रत्नागिरीमध्ये शिंदे सेना ८ जागांवर आघाडीवर आहे, तर कॉंग्रेस, शिवसेना यांना अजून एकाही जागेवर आघाडी घेता आली नाही.

रत्नागिरीच्या चिपळूणमधून भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव आघाडीवर आहेत.

आठ वर्षांनंतर निवडणूक

दीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. ग्रामीण भागात प्रचाराच्या फेऱ्या, सभा, बैठकांचा सपाटा लागला होता. प्रत्येक पक्षाने आपली संघटनात्मक ताकद पणाला लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

advertisement

धनुष्यबाण विरुद्ध मशाल लढत

जरी निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील खरी लढत दोन शिवसेनांमध्येच रंगली. धनुष्यबाण आणि मशाल या चिन्हांभोवतीच संपूर्ण प्रचार फिरताना दिसला. अनेक गटांमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याने मतदारांमध्येही उत्सुकता वाढली होती.

सामंत बंधूंची प्रतिष्ठा पणाला

advertisement

या निवडणुकीत उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. रत्नागिरी जिल्ह्यावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सामंत बंधूंनी विशेष लक्ष घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

आकड्यांच्या भाषेत जिल्हा परिषद निवडणूक

रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी एकूण ५६ जागा असून, त्यासाठी २२९ उमेदवार रिंगणात होते. पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी तब्बल ४३४ उमेदवारांनी नशीब आजमावले. पाली-नाणीज पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळे (शिंदे गट शिवसेना) यांची बिनविरोध निवड झाली.

advertisement

रत्नागिरीतील राजकीय बलाबल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे (भाजप) हे जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेतृत्व मानले जाते. आमदारांमध्ये उदय सामंत, योगेश कदम, शेखर निकम, किरण सामंत आणि भास्कर जाधव यांचा प्रभाव विविध भागांत दिसून आला.

गटनिहाय यादी

केळशी जिल्हा परिषद गट

गुणाजी गावणूक – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

जितेंद्र तुळशीराम जाधव – बहुजन समाज पार्टी

advertisement

नितीन भिकू दुर्गवळी – शिवसेना

श्रीकांत हरी मुखे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पालगड जिल्हा परिषद गट

नेहा युवराज जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

शेडगे मीनाक्षी विनय – शिवसेना

हर्णे जिल्हा परिषद गट

शितल प्रमोद जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)

ऐश्वर्या राजेंद्र धाडवे – शिवसेना

जालगाव जिल्हा परिषद गट

किशोर भालचंद्र देसाई – शिवसेना

अक्षय श्रीधर फाटक – भारतीय जनता पार्टी

विकास चंद्रकांत मेहता – अपक्ष

कोळबांद्रे जिल्हा परिषद गट

सलीम अब्दुल कादिर खोत – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

प्रभाकर गोलांबडे – शिवसेना

राजाराम रामा रसाळ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

दाभोळ जिल्हा परिषद गट

स्मिता उदय जावकर – भारतीय जनता पार्टी

साधना मेहिर महाजन – शिवसेना

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना: 16 जानेवारी 2026

अर्ज दाखल: 16–21 जानेवारी

छाननी: 22 जानेवारी

माघार: 27 जानेवारी

प्रचार समाप्ती: 5 फेब्रुवारी (रात्री 10)

मतदान: 7 फेब्रुवारी 2026

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हवामानाचा परिणाम, गहू पिकांवर फुफुंदी मावा रोगाचा प्रदुर्भाव? असं करा व्यवस्थापन
सर्व पहा

मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रत्नागिरी ZP-PS निकाल 2026 LIVE | शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेनेत तगडी लढत, कोण मारणार बाजी?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल