अजित पवारांनी घेतली आढावा बैठक
आज मध्य रेल्वेच्या अहिल्यानगर-बीड-परळी या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रलंबित कामं, रेल्वेसंदर्भात नवीन धोरण, जमीन खरेदीसंबंधी येणाऱ्या अडचणी, स्थानकांसाठी आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे तसंच इतर प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
advertisement
प्रलंबित कामं पूर्ण करा
या प्रकल्पासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन यावेळी दिलं. त्याचप्रमाणे प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती देखील अजित पवार यांनी केली आहे.
अजित पवार म्हणतात..
दरम्यान, राज्यातील या नव्या रेल्वे प्रकल्पामुळे रेल्वे सेवा सुधारून नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीत भर पडेल आणि या भागाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, अशी खात्री देखील अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.