TRENDING:

मराठीचा मुद्दा पेटलेला असताना गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठातून मराठी साहित्य विषय हद्दपार

Last Updated:

गोंडवाना विद्यापीठात भविष्यात यासर्व नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना व प्राध्यापक पदभरती महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद लेंडे खैरगावकर यांनी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय तिमांडे, गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी बी.ए.पदवीच्या अभ्यासक्रमातून मराठी साहित्य विषय हद्दपार केल्याने बी.ए.पदवी परीक्षेला मराठी साहित्य विषय शिकविणार्‍या प्राध्यापकांवर बेरोजगारीची पाळी आली आहे.
गोंडवाना विद्यापीठ
गोंडवाना विद्यापीठ
advertisement

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावनी २०२४~२५ या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यापीठात केल्या गेली.गोंडवाना विद्यापीठात मराठी साहित्य या मुख्य विषयाला बंद करून मराठी भाषा हा एकच विषय नेमलेला आहे. मराठी साहित्य विषयाचा कार्यभार शिल्लक न ठेवल्यामुळे रिक्त जागांवर तासिका प्राध्यापकांची नियुक्ती होऊ शकली नाही. गोंडवाना विद्यापीठात भविष्यात यासर्व नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना व प्राध्यापक पदभरती महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद लेंडे खैरगावकर यांनी केला आहे.

advertisement

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील पदवी,पदव्युत्तर महाविद्यालय मिळून गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्र सरकारने निर्माण केले. गडचिरोली गोंडवन प्रदेश असला तरी तो महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी व या भाषेतील वाग्ड्डमयाचे अध्यापन हे मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जतन करणारा विषय आहे. हा विषय आतापर्यंत राज्यातील सर्व विद्यापीठात शिकविला गेला. अनेक साहित्यिक, समीक्षक, कलावंत, कवी, गीतकारांची जडणघडण मराठी साहित्याने केली. किंबहुना सरकार दरबारी मराठी विषयाच्या अध्यापनाचा कार्यभार मराठी भाषा व मराठी साहित्य असा निश्चित केला आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी शासनाच्या या कार्यभाराला हरताळ फासला असून विद्यापीठात बी.ए.पदवी विषयाला मराठी साहित्य हा अध्यापनाचा विषय बंद केल्याने एकंदरच मराठी साहित्य विषय शिकविणार्‍या प्राध्यापकांचा कार्यभारच बंद केला आहे.

advertisement

कुलगुरूंनी वाग्ड्डमय अध्यापन परंपरेलाच हरताळ फासला

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. राज्य सरकारने विदर्भातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना केली. याच सरकारच्या अधिपत्त्यातील विद्यापीठ आणि कुलगुरू हे मराठी भाषा, साहित्य संस्कृतीचे या भाषेत अध्यापन करणार्‍या प्राध्यापकांच्या जीवावर उठले आहे. ही महाराष्ट्रातील मराठी मानसांची अवहेनला आहे.सरकारने हे थांबवायला हवे. विद्यापीठ हे अनेक विषयांची निर्मिती करते. विद्यापीठ हे अनेक विषयांना अध्यापनासाठी चालना देत असते. मात्र गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू बोकारे यांनी महाराष्ट्राच्या वाग्ड्डमय अध्यापन परंपरेलाच हरताळ फासला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सरकारने मेजर विषयाचाच कार्यभार मोजलेला आहे.या कार्यभारात मराठी भाषा हा एकच विषय ठेवलेला आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयात यापुढे मराठी साहित्य विषय शिकविला जाणार नाही ही महाराष्ट्रातील साहित्य चळवळीची हानी आहे. मराठी भाषेची हानी आहे व पर्यायानेच मराठी साहित्य शिकविणार्‍या प्राध्यापकाला बेरोगजागार ठरविणारे धोरण आहे, अशा संतप्त भावना व्यक्त होत आहे.

advertisement

राज्यात अनेक वर्षांपासून साहाय्यक प्राध्यापकांची पदभरती झालेली नाही. गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणार्‍या अनेक महाविद्यालयात नेट, सेट, पीएच.डी.पात्रताधारक उच्चशिक्षित बेरोजगारांची रिक्त जागांवर तासिका प्राध्यापकपदी नेमणूक केल्या जात होती. कुलगुरू डॉ. बोकारे यांच्या या मराठी साहित्यविरोधी अध्यापन धोरणाचा महासंघ धिक्कार करून त्यांनी आंदोलनाची घोषणा केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठीचा मुद्दा पेटलेला असताना गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठातून मराठी साहित्य विषय हद्दपार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल