TRENDING:

मोहित कंबोज यांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती, 8 सेकंदाच्या 'त्या' Video ने राजकारण तापलं

Last Updated:

शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी लावलेली हजेरी सध्या संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय ठरली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जाणारे नेते जेव्हा एकाच छताखाली एकत्र येतात, तेव्हा राजकीय चर्चांना उधाण येणे स्वाभाविक असते. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कन्येच्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त मुंबईत अशाच एका 'हाय-प्रोफाइल' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी लावलेली हजेरी सध्या संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय ठरली आहे.
News18
News18
advertisement

राजकारणात 'कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो' या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईत आला आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस सोहळा शनिवारी रात्री  मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. मोहित कंबोज आणि ठाकरे गट यांच्यातील विस्तव जात नसताना आदित्य ठाकरेंनी या सोहळ्याला जाणे हे अनेकांसाठी धक्कादायक मानले जात आहे.

advertisement

आदित्य ठाकरेंची उपस्थिती, चर्चांना उधाण

मोहित कंबोज हे मागील काही काळापासून मातोश्री आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करण्यासाठी ओळखले जातात. बीएमसीमधील कथित घोटाळा प्रकरणी कंबोज यांनी नेहमीच ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाकडूनही कंबोज यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आक्रमक भूमिका घेतली होती.  टोकदार संघर्षानंतरही आदित्य ठाकरे यांनी कंबोज यांच्या निमंत्रणाचा मान राखून सोहळ्याला उपस्थिती दर्शवल्याने राजकारण एका बाजूला आणि वैयक्तिक संबंध दुसऱ्या बाजूला  असा संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.

advertisement

कोणकोणते नेते उपस्थित होते?

या सोहळ्यात केवळ आदित्य ठाकरेच नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. एकाच वेळी भाजप, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) या तिन्ही भिन्न विचारसरणीच्या पक्षांचे बडे नेते एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.  सोशल मीडियावर या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

आदित्य ठाकरेंची ही उपस्थिती केवळ शिष्टाचार म्हणून होती की पडद्यामागे काही नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, कंबोज यांनी सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करत या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. ऐन निवडणुकांच्या धामधुमीनंतर ही कौटुंबिक भेट राजकारणात काय वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोहित कंबोज यांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती, 8 सेकंदाच्या 'त्या' Video ने राजकारण तापलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल