यवतमाळ : यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ-वाशिमचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. एक टिप्परने खासदार देशमुख यांच्या कारला जोराची धडक दिली. सुदैवाने या खासदार संजय देशमुख यांना कोणतीही दुखापत झाली नाही. संजय देशमुख हे सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, या अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, वसमतमध्ये दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे एका कार्यक्रमातून परत येत होते. देशमुख हे आपल्या इनोव्हा क्रिस्टा या एसयूव्ही प्रवास करत होते. दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ देशमुख यांची कार पोहोचली असताना भरधाव वेगात असलेल्या टिप्परने देशमुख यांच्या इनोव्हाला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, इनोव्हाच्या मागील भागाचा चक्काचूर झाला.
[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/YTL-ACCIDENT-4-2026-02-28026af1111a59f1c5f1fbdbfd2d0127.mp4"][/video]
या अपघातात खासदार देशमुख याांच्या इनोव्हा एसयूव्हीचं नुकसान झालं मात्र सुदैवाने खासदार संजय देशमुख हे सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे. अपघातानंतर खासदार देशमुख यांना तातडीने दिग्रस येथील मात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी याा अपघातात देखमुख यांना किरकोळ दुखापत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, असं देशमुख यांनी सांगितलं.
खासदार देशमुख यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनाास्थळी धाव घेतली. टिप्पर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
