TRENDING:

Metro Slab Collapsed: मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

Last Updated:

शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास एलबीएस मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळून काही लोक दबल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. स्लॅब कोसळल्याने दोन ते चार वाहनेही दबली असल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
advertisement

शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास एलबीएस मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. जॉन्सन गार्डनच्या पुढील बसस्टॉपजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळला. स्लॅबखाली काही लोक अडकल्याची माहिती आहे. तसेच काही लोक जखमी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

advertisement

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्लॅब हटवून जखमींना जवळील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जॉन्सन गार्डनजवळ सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

तीन जण गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

चार जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. रामधन यादव यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. राजकुमार यादव, महेंद्र यादव आणि दीपा रुहिया असे जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत.

advertisement

मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे तासाभरातच दुर्घटनास्थळी

कंत्राटदारांनी सर्व नियम पाळून काम करणे गरजेचे आहे. कारण विकास करताना मुंबईकरांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे मुंबई शहराच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे म्हणाल्या. दुर्घटना घडल्यानंतर तासाभरातच त्या दुर्घटनास्थळी पोहोचल्या. तिथे त्यांनी अधिकाऱ्यांकडून अपघाताबद्दल माहिती घेतली. तसेच रुग्णांना दाखल केलेल्या रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली.

advertisement

स्लॅब कोसळला, एमएमआरडीएचे स्पष्टीकरण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दुसऱ्यांची मनं वाचणारे डॉक्टरच प्रेमात वेडे; घरचा विरोध अन् जातीची भिंत, काय केल
सर्व पहा

आज दुपारी १२:१५ वाजता मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील मेट्रो लाईन बांधकामाच्या पियर पी१९६ जवळ एक घटना घडली, जिथे पॅराफीटचा एक भाग उंचीवरून पडला आणि तो रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटो रिक्षावर आदळला. दोन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे आणि आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरविली जात आहे. मेट्रो प्रकल्प पथक घटनास्थळी आहे आणि बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधून मदत कार्य आणि घटनास्थळ सुरक्षित करण्याचे काम करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Metro Slab Collapsed: मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल