मुंबई-पुणे महामार्ग हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग मानला जातो. दररोज हजारो नागरिक, पर्यटक, तसेच उद्योग क्षेत्राशी निगडित वाहनांची या मार्गावर सतत वर्दळ असते. सध्या या मार्गाचे दोन्ही दिशांना चार-चार पदरी असे आठ पदरी स्वरूप आहे. मात्र, वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता या रस्त्याचा रुंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
advertisement
एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील दहा ते बारा दिवसांत हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. शासनाचा हिरवा कंदिल मिळाल्यानंतर द्रुतगती मार्गाच्या दहा पदरीकरणाचे काम तात्काळ हाती घेण्यात येईल.
दहा पदरीकरणानंतर वाहनचालकांना सध्याच्या तुलनेत कमी वेळ लागणार आहे. पुणे-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी होईल. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात किंवा शनिवार-रविवारी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
किती रुपये येणार खर्च?
प्रकल्पाच्या खर्चात 1,420 कोटी रुपयांची वाढ होणार आहे, तसेच एकूण बांधकाम खर्च 8,440 कोटी रुपये, तर प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 14,260 कोटी अपेक्षित आहे. या महामार्गाच्या विस्ताराचे काम 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि ते ते 2029-30 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कधी होणार काम पूर्ण?
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे 2030 पर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे 10 पदरी सुपरहायवेमध्ये रूपांतर करण्याची योजना एमएसआरडीसीने जाहीर केली आहे. वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि भविष्यातील प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या महामार्गावर दररोज सुमारे 65,000 वाहने प्रवास करतात, तर शनिवार-रविवारी हा आकडा 1 लाखांच्या वर पोहोचतो
