TRENDING:

Mumbai: सगळ्या संकटांवर उपाय, फक्त एक फोन करा, बंगाली बाबाला पोलिसांचा इंगा, बेड्या ठोकल्या

Last Updated:

‘बाबा बंगाली’ म्हणून फसवणूक करणारा मोहम्मद नझीर अंदारी पोलिसांच्या अटकेत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : गरजू नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा दावा करणाऱ्या एका बंगाली बाबाला मुंबई रेल्वे पोलिसांनी अटक केली. लोकलमध्ये पोस्टर लावणाऱ्या बंगाली बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ट्रेनमध्ये लावण्यासाठी ठेवलेले १५ हजार पोस्टर जप्त करण्यात आले.
मुंबईत बंगाली बाबाला बेड्या
मुंबईत बंगाली बाबाला बेड्या
advertisement

रेल्वे पोलिसांनी रे रोड परिसरात कारवाई केली. ‘बाबा बंगाली’ म्हणून फसवणूक करणारा मोहम्मद नझीर अंदारी पोलिसांच्या अटकेत आहे. प्रेमविवाह, वशीकरण, नोकरी, पती-पत्नी वाद, कोर्ट केस, काळी जादू आदी समस्यांवर १०० टक्के उपायाची हमी, असे दावे बंगाली बाबाने पोस्टरमधून केले होते.

जाहिरात पाहून लोकांनी फोन केलेल्या लोकांकडून बंगाली बाबा पैसे उकळत होता. हतबल नागरिकांना जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक करण्याचे काम बंगाली बाबाने केले. लोकलमध्ये अवैध जाहिराती वाढल्याने तपास सुरू होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाचे दर तेजीत, डाळींब आणि आल्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात बंगाली बाबा बरोबर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तब्बल 15 हजार पोस्टर्स रेल्वे पोलिसांनी जप्त केले. जे अडचणीत आहेत, त्यांच्या समस्या सोडवतो, असा दावा करणाऱ्या बाबालाच अटक केल्याने त्याच्या समर्थक वर्गात दहशत पसरली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai: सगळ्या संकटांवर उपाय, फक्त एक फोन करा, बंगाली बाबाला पोलिसांचा इंगा, बेड्या ठोकल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल