समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन राजेंद्र कटरे (18 वर्ष)आणि कोमल भगवती यादव (17 वर्षे) असं मृत विद्यार्थ्यांची नाव आहे. हे दोघेही चांगले मित्र होते. दोघेही केटरिंगच्या कामासाठी गेले होते. मध्यरात्री घरी परतत असताना भीषण अपघात झाला. आहे मानेवाडा मार्गावर समोरून येणारा मालवाहू टेम्पो मुख्य रस्त्यावर हा राईट टर्न घेऊन जात रस्ता ओलांडत असताना दोघेही भरधाव दुचाकीवरून टेम्पोला धडकले. टेम्पो चालक हा घटनास्थळावरून निघून गेला.
advertisement
Watch Video :
टेम्पो चालकाचा शोध सुरू
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी वेगात होती त्यामुळे अचानक टेम्पो समोर आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि थेट जाऊन टेम्पोला धडकले. दोन्ही दुचाकी चालकांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने अजनी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून टेम्पो चालकाचा शोध घेत आहे
