TRENDING:

पांढरा गेला, आता 'तपकिरी' आला! विदर्भात पिकणार नैसर्गिक हिरवा आणि तपकिरी कापूस

Last Updated:

नागपूरच्या कापूस संशोधन केंद्रानं तपकिरी आणि हिरव्या रंगाच्या कापसाचं वाण विकसीत केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर :  'पांढरं सोनं’ म्हणून ओळखला जाणारा कापूस आता विविध रंगात पाहायला मिळणार आहे. नागपूरच्या कापूस संशोधन केंद्रानं तपकिरी आणि हिरव्या रंगाच्या कापसाचं वाण विकसीत केलं आहे. यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. बोंड फुटल्यानंतर सूर्यप्रकाशात कापसाचं रंग अधिक गडद होत जातो.विशेष म्हणजे वारंवार धुतल्यानंतरही त्याचा रंग फिका पडत नाही.
News18
News18
advertisement

कापसाचा रंग कोणता? या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत एकच होतं, पांढरा. पण आता नागपूरमध्ये रंगीत कापसाचं यशस्वी संशोधन झालं आहे. तपकिरी आणि हिरव्या रंगाचा कापूस विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. तपकिरी कापसाचे दोन प्रकार आढळले आहेत, फिकट तपकिरी आणि गडद तपकिरी. बोंड फुटल्यानंतर सूर्यप्रकाशात आल्यानंतर तपकिरी कापूस अधिक गडद होत जातो. विशेष म्हणजे वारंवार धुतल्यानंतरही त्याचा रंग फिका पडत नाही.हिरव्या रंगाचा कापूसही विकसित करण्यात आला आहे. मात्र हिरवा रंग अजून पूर्णपणे स्थिर नाही. बोंड फुटल्यानंतर हिरवा रंग खुलतो

advertisement

२५ वर्षांच्या प्रयत्नानंतर यश

नागपूरच्या संशोधन केंद्रात १२ हजारांहून अधिक कापसाच्या प्रजातींचं जर्मप्लाझम जतन करण्यात आलं आहे. जंगली प्रजातींच्या साहाय्याने ‘वैदेही वन’ नावाचं तपकिरी वाण २५ वर्षांच्या प्रयत्नानंतर विकसित करण्यात आलं आहे. ही सर्व वाणं सरळ (नॉन-हायब्रीड) प्रकारातील आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बियाणं खरेदी करण्याची गरज भासणार नाही.“रंगीत कापसाच्या विविध प्रजाती विकसित करण्यासाठी आमच्याकडे मोठं जर्मप्लाझम बँक आहे. भविष्यात आणखी रंग विकसित करण्याचे प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास संशोधक डॉ विनिता गोतमारे यांनी व्यक्त केला.

advertisement

वस्त्रोद्योगात मोठा बदल

उद्योग आणि पर्यावरण रंगीत कापसामुळे वस्त्रोद्योगात मोठा बदल होऊ शकतो. सध्या पांढऱ्या कापडाला रंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि रासायनिक रंग वापरले जातात. डायिंग प्रक्रियेमुळे पाणी आणि मातीचं प्रदूषण होतं.

नैसर्गिक रंगीत कापूस वापरल्यास काय फायदा होईल?

  •  डायिंग प्रक्रिया टाळता येईल
  •  उत्पादन खर्च कमी होईल
  • advertisement

  • पर्यावरणीय हानी कमी होईल
  • कलर कायम टिकणार असल्याने कॉटन कापड दीर्घकाळ वापरता येईल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

रंगीत कापूस लागवड केल्यास शेतकऱ्यांना जादा भाव मिळण्याची शक्यता आहे. सरकारने योग्य धोरण आखल्यास या कापसाला बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण होऊ शकते. तथापि, पांढऱ्या कापसाच्या तुलनेत तपकिरी आणि हिरव्या कापसाचा धागा थोडा कमी मजबूत असल्याचंही संशोधनात स्पष्ट झालं आहे. रंगीत कापसाच्या या यशामुळे भविष्यात टेक्सटाईल इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलू शकतो. पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक वस्त्रनिर्मितीकडे हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पांढरा गेला, आता 'तपकिरी' आला! विदर्भात पिकणार नैसर्गिक हिरवा आणि तपकिरी कापूस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल