मिळालेल्या माहितीनुसार, जितू सोनेकर हा मुलगा शंकरराव चव्हाण विद्यालयाचा सहाव्या वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे तो 15 सप्टेंबर रोजी शाळेसाठी घरून निघाला होता.मात्र शाळा सुटल्यानंतर घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याची शोधाशोध करण्यास सुरूवात केली होती.या दरम्यान मित्रांकडून चौकशी केली असता जितूला कारमध्ये बसवून नेण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाच्या दृष्टीने तपास सूरू केला होता.
advertisement
ही घटना खंडणीतून घडल्याची माहिती होती.पण दोन दिवस उलटून देखील खंडणीची एक कॉल देखील आला नव्हता.या दरम्यान पोलिसांकडून मुलाचा शोध सूरूच होता पण त्याचा काहीएक थांगपत्ता लागला नव्हता. अखेर आज चनकापूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनीलगतच्या शिवारात गुराख्याला लहान मुलांचा शाळेच्या गणेश घातलेला लहान मुलांचा मृतदेह झुडपात दिसून आला होता. त्यानंतर पोलिसांना घटनेचा माहिती दिल्यानंतर दोन दिवसांनी बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता.
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर लागलीच फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.यावेळी पोलिसांनी गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. या प्रकरणात पोलीसांनी आरोपी राहुल पाल, अरुण भारती आणि यश वर्मा (तिघेही रा. चनकापूर) यांना अटक केली होती.या आरोपींनी खंडणीसाठी अपहरण केले असताना त्यांची हत्या का केली? याच गुढं उकललं नाही आहे.
कारण जीतूचे वडील यांना शेत विकल्याचे पैसे मिळणार असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या आरोपींना मिळाली होती. त्यामुळे मुलाचे अपहरण करून वडिलांना खंडणी मागण्याच्या तयारीत होते. मात्र अपहरण केल्यानंतर मुलाने प्रश्न विचारू लागल्याने त्यांनी त्याची गळा आवळून हत्या केली. दोन दिवस मृतदेह लपवून ठेवत प्रकरण तापत असल्यानं अखेर मृतदेह झुडपात फेकून दिला होता,अशी माहिती नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे.