पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मृत विवेक आणि देवा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून गावातील वर्चस्वावरून वाद सुरू होता.हा वाद सूरू असतानाच रात्री सुमारास दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. हे भांडण इतक्या टोकाला पोहोचले की दोघे जण एकमेंकांच्या जीवावर उठले.यावेळी रागाच्या भरात देवा वंजारीने पाना आणि ट्रकचे चाक उघडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजाराने विवेकर जोरदार वार केले होते. या हल्ल्यात विवेक गंभीररीत्या जखमी झाला होता.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ विवेकला रुग्णालयात दाखलं केलं होतं.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.या घटनेनंतर जुनी कामठी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित देवा वंजारी याला अटक करण्यात आली आहे.
विवेक तांडेकर आणि देवा वंजारी यांच्यात जुन्या वैमनस्य होते.या वैमनस्यातूनच ही हत्या झाल्याची माहिती आहे.या घटनेनंतर तांडेकर कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.तसेच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिसांनी सूरू केला आहे.