नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून घडली आहे. मुख्य आरोपीचा काही दिवसांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत वाद झाला होता. याच वादातून तिने ब्रेक अप केलं होतं. हा ब्रेक अप आरोपीच्या जिव्हारी लागला होता. दरम्यान, आरोपीची 'एक्स गर्लफ्रेंड' इन्स्टाग्रामवर दुसऱ्या एका मुलाशी बोलते, अशी माहिती आरोपीला समजली होती. हाच राग मनात धरून आरोपीनं भयावह बदला घेतला आहे.
advertisement
मंगळवारी रात्री आरोपीनं १० ते १२ जणांच्या टोळीला हाताशी धरून महाल परिसरात दहशत निर्माण केली. आरोपी टोळक्याने हातात शस्त्रांसह लाकडी दांडके घेऊन तरुणी राहत असलेल्या महाल परिसरातील गाड्यांची तोडफोड केली. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत आरोपी तरुण धुडगूस घालताना स्पष्टपणे दिसत आहेत. १० ते १२ तरुण हातात धारदार शस्त्रे, लाठ्या आणि बांबू घेऊन फिरत आहेत. टोळीने परिसरातील पार्क केलेल्या एक डझनपेक्षा जास्त दुचाकींची तोडफोड केली आहे. तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आरोपींनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला.
[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-26-at-09.06.34-1-2026-02-34050f37212e29770b2e0e01673c77ea.mp4"][/video]
पोलिसांकडून सात जण ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत, गुन्हेगारांचा शोध सुरू केला. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
