या छाप्यात जयश्री संतोष सोळंकी, सलमान उर्फ रोशन डोंगरे आणि अक्षय रामटेके या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांचा आणखी एक साथीदार फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस तपासात उघड झाले की आरोपी महिलांना आर्थिक प्रलोभन दाखवून देह व्यापारासाठी प्रवृत्त करत होते. महिलांना फसवून या व्यवसायात ढकलले जात असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षिततेत ठेवले आहे.
advertisement
नागपूर पोलिसांनी सांगितले की, ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत महिलांचे शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. देह व्यापारासारख्या गुन्हेगारी प्रकरणांवर नागपूर पोलिसांचा धडक मोहीम सुरू असल्यामुळे नागरिकांनीही अशा प्रकारच्या प्रकरणांची माहिती पोलिसांना द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून सुरू असून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
