सुनीता जामगडे अनेक महिन्यांपासून पाकिस्तानमधील धर्मगुरू म्हणून काम करणाऱ्या जुल्फिकार यांच्यासोबत समाजमाध्यमातून संवाद साधत होती. तिचा त्या व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न होता, अशीही चर्चा आहे. तिला नागपुरात आणल्यानंतर त्या गुप्तचर किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी आहे काय, याचा तपास नागपूर पोलिसांनी सुरू केला आहे. सुनीता पाकिस्तानमध्ये 4 किमीपर्यंत आत कशी गेली, सुनीताला पाकिस्तानमध्ये जाण्यासाठीचे छुपे रस्ते कोणी दाखविले याचा तपास आता नागपूर पोलीस करत आहे.
advertisement
पाकिस्तानात कोणाच्या मदतीने गेली?
सुनीताने कारगिलच्या ज्या भागातून पाकिस्तानात प्रवेश केला, तो उंच डोंगराळ भाग आहे. तिथं माहिती शिवाय जाणं शक्य नाही. पर्वत रांगांशिवाय उंच उंच झाड असल्याने तिथून सामान्य नागरिक जाण शक्य नाही. त्यामुळे सुनीताला कोणीतरी या सगळ्या मार्गांची माहिती दिली असेल आणि त्या माहितीच्या आधारे सुनीता पाकिस्तानमध्ये गेल्याची शक्यता आहे. ज्या भागातून सुनितांना मार्गक्रमण केलं त्या भागामध्ये 24 तास पोलीस सुरक्षा देणं सुरक्षा दलाला शक्य नाही आणि त्याचाच फायदा सुनीता आणि तिच्या सहकाऱ्यांना घेतला असल्याची शंका निवृत्त करणार अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली.
सुनीताच्या मोबाईलमध्ये एक संशयास्पद अॅप
सुनीताने जामगडे हिने तिच्या मोबाईलचा सर्व डेटा डिलिट केला होता, त्यामुळे पोलिसांना संशय आहे. आता नागपूर सायबर पोलिसांनी तज्ज्ञ टीम सुनीताच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनीताच्या मोबाईलमध्ये एक संशयास्पद अॅप आढळून आले असून त्या अॅपला डिकोड करणं किंवा रिमूव्ह करण्याचे तंत्र आपल्याकडे नाही. त्यामुळे ते अॅप सुनीताला कुठून मिळालं? त्याच अॅपच्या माध्यमातून सुनीता हेरगिरी करत होती का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहे.
सुनीताची उडवाउडवीची उत्तरं
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगील येथे गेले. पैसे संपल्यावर तिथे नोकरी शोधली आणि पाकिस्तान गेली, अशी उडवाउडवीची उत्तरं ती देत आहेत, असं पोलीस सांगतात. पण तिचा जबाब, कारगील पोलीसांची माहिती आणि तिचा मोबाईल डाटा तपासणी केली जाणार आहे.
नागपूर का महत्त्वाचे?
नागपूर शहर अतिशय संवेदनशील ठिकाण आहे त्याचे कारण म्हणजे नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, नागपूर मध्ये ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंट सेंटर आहे. नागपूरमध्ये एअर फोर्सचं मेंटेनन्स कमांड आहे. हवाई दलाची फायटर हेलिकॉप्टर नागपुरात अनेक वेळा असतात . नागपूरमध्ये आरबीआय बँक आहे. त्यामुळे सुनीताने या जागांची हेरगिरी केली असेल तर शत्रू पक्षाला ही माहिती मोलाची असून त्याचा परिणाम सुरक्षेवर होऊ शकतो.
पाकिस्तानत कशी गेली त्याचं रिक्रिएशन करणार
सुनिता जामगडेला न्यायालयाने दोन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र दोन जून नंतर न्यायालयाने सुनीताला न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे आता या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी कारगिल पोलिसांची एक टीम नागपूरमध्ये दाखल झाली असून कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहे. सुनिताला प्रोडक्शन वॉरंटवर घेऊन कारगिलला नेऊन ज्या भागातून सुनीताने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला त्या सगळ्या जागी नेत रिक्रिएशन करून सत्यता पडताळणी केली जाणार आहे.
