अल्कोहोल आणि रम हे घेणं तसं शरीरासाठी, आरोग्यासाठी धोकादायक असतं. डब्ल्यूएचओने अल्कोहोलला ग्रुप वन कार्सिनोजन म्हणून वर्गीकृत केलं आहे, म्हणजेच यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. कोणत्याही प्रमाणात मद्यपान करणं हे पूर्णपणे सुरक्षित नसू शकतं. कुठलं निश्चित प्रमाण नाहीये.
आपण 2025 संपून 2026 मध्ये पदार्पण करत आहोत. पण पाश्चिमात्य देशांची संस्कृती बघून तसं आपण करत असतो. नवीन वर्ष असू देत किंवा कुठली पार्टी असू दे, आपल्याकडे सर्रासपणे दारू घेण्याचं प्रमाण वाढत आहे. थोडासा मान राखला पाहिजे. लिमिटेड सेवन करा. एखाद दुसरा पॅक घेतला तर चालतो. पण ते देखील हानिकारक आहे. जास्त जर घेतलं तर याचे अनेक दुष्परिणाम तुमच्यावरती होतात. कधीतरी घेतलं तरी चालतं, त्याचं व्यसन लागू नये याची काळजी घ्यावी.
advertisement
बाजरीची भाकरी नेहमीच खाता; पण थंडीत नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ, पाहा सोपी रेसिपी, Video
रम किंवा दारू ऐवजी तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता किंवा आपली भारतीय चांगले ड्रिंक आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आता हिवाळा आहे आणि आपल्यापैकी अनेक जणांना असं वाटतं की आपण जर दारू किंवा रम घेतली तर ती फायद्याची असते. पण असं नाही आहे. हे जरी गरम वाटत असले घेण्यासाठी तरी ते शरीराला थोड्या वेळच गरम ठेवतो, पण गरम ठेवण्यापेक्षाही अनेक अवयव खराब करण्याला जास्त कारणीभूत ठरतं. त्यामुळे तुम्ही हे न घेतलेले कधीही चांगले आहे, असं आहार तज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी सांगितलं.





