नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
मराठा आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे. पण ओबीसी आरक्षनाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, सरकार मराठा आणि ओबीसींच्या हक्कावर गदा आणणार नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली त्यावर आज सर्व पक्षीय नेते चर्चा करतील. सरकार त्यावर तोडगा काढेल.
advertisement
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. राजकारणाची एक पातळी, मर्यादा असते. मात्र ठाकरे यांनी केलेल्या टीकेनं मर्यादा संपली आहे. ते खालच्या पातळीवर जाऊन पीएम मोदी आणि फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. भाजप कार्यकर्ते संयम सोडतील, थांबणार नाही. कार्यकर्ते आता ठाकरे यांना उत्तर देतील असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
advertisement
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
September 11, 2023 12:49 PM IST
