निखिल विनायक नागोसे असं गुन्हा दाखल झालेल्या ३२ वर्षीय आरोपीचं नाव आहे. पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २ जानेवारी २०२४ रोजी ती आणि आरोपी निखिल दोघेही कामानिमित्त उमरेड येथे गेले होते. काम आटोपून परत येत असताना, रात्री उशीर झाल्याने निखिलने तिला म्हाळगीनगर येथील आपल्या खोलीवर नेले. तिथे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
advertisement
या घटनेनंतरही निखिलने अनेकवेळा हा प्रकार केला. मात्र, जेव्हा पीडित तरुणीने लग्नाविषयी विचारणा केली, तेव्हा त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने अखेर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि निखिल विरोधात तक्रार दाखल केली.
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी निखिल विनायक नागोसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करत आहेत. लग्नाचं आमिष दाखवून अशाप्रकारे लैंगिक अत्याचार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.