नेमकी घटना काय?
नागपूर विद्यापीठाचा १० ते १२ मुलींचा कराटे संघ शनिवारी स्पर्धेसाठी रवाना झाला होता. भुवनेश्वरला पोहोचल्यानंतर हा संघ बालासोरकडे जाण्यासाठी 'फलकनुमा एक्स्प्रेस' मध्ये चढला. याच प्रवासादरम्यान काही टवाळखोर तरुणांनी विद्यार्थिनींना त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणांनी विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत अश्लील चाळे केले. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी धीर एकवटून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आणि तातडीने आपल्या कुटुंबियांना पाठवला.
advertisement
विद्यापीठ प्रशासनाचा हलगर्जीपणा?
या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विद्यापीठ प्रशासनाचे नियोजन. संघात १०-१२ मुली असताना त्यांच्यासोबत केवळ एक महिला आणि एक पुरुष प्रशिक्षक देण्यात आले होते. एवढंच नव्हे तर प्रवासादरम्यान हे प्रशिक्षक दुसऱ्या डब्यात होते, तर विद्यार्थिनी वेगवेगळ्या डब्यांमध्ये विखुरलेल्या अवस्थेत प्रवास करत होत्या. मुलींच्या डब्यात कोणीही जबाबदार व्यक्ती नसल्याचा फायदा घेत तरुणांनी हे कृत्य केलं. यामुळे विद्यापीठाने विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत दाखवलेल्या हलगर्जीपणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
RPF ची कारवाई आणि तरुणांना बेड्या
प्रवासादरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर विद्यार्थिनींनी तातडीने रेल्वे सुरक्षा दलाशी (RPF) संपर्क साधला. माहिती मिळताच आरपीएफच्या जवानांनी तत्परता दाखवत संबंधित डब्यात धाव घेतली. गैरवर्तन करणाऱ्या तरुणांना जवानांनी ताब्यात घेतले आणि त्यांना पुढच्या स्टेशनवर रेल्वेतून खाली उतरवून पुढील कारवाई सुरू केली. मात्र सामन्यांना जाणाऱ्या मुलींसोबत असा प्रकार घडल्याने नागपूर विद्यापीठाचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे,
