TRENDING:

sana khan murder case : बेपत्ता असलेल्या भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्या, कुख्यात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Last Updated:

sana khan murder case : गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजपच्या पदाधिकारी सना खान यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय तिमांडे, प्रतिनिधी
(सना खान)
(सना खान)
advertisement

नागपूर, 11 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजपच्या पदाधिकारी सना खान यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.या प्रकरणी कुख्यात आरोपी अमित शाहुला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीने सना खान यांच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 8 दिवसांपासून सना खान बेपत्ता होत्या. या प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केलं.

advertisement

(गाडीत रक्ताचे डाग अन् आरोपी बेपत्ता; सना खान प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर पोलीस जबलपूरला रवाना)

जबलपूर येथील गुंड पप्पू साहू याच्या बरोबर लग्नानंतर वाद झाले होते. या प्रकरणी आता पप्पू साहू याच्या नोकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पप्पू साहू याच्या कारमधून रक्ताचे डाग धुवून काढल्याची नोकराची माहिती दिली. नागपूर पोलिसांच्या पथकाने त्याला मध्य प्रदेशमधून ताब्यात घेतलं.

advertisement

काय आहे प्रकरण?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

सना खान ह्या नागपूर पश्चिम महिला भाजपच्या पदाधिकारी असून त्या मागील आठ दिवसापासून बेपत्ता होत्या. त्यांना जबलपूर येथून एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्या एक ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची तक्रार सना खान यांच्या आईने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. अखेर सना खान यांचा खून झाल्याचं निष्पन्न झालं. पप्पू साहूच्या नोकराने कबुली दिली की त्याने गाडीच्या डिक्कीतील रक्त साफ केलं होतं. यासोबतच मृतदेह हिरन नदीत फेकल्याचेही त्याने सांगितलं. सनाच्या हत्याकांडात मुख्य आरोपी पप्पू साहू याच्याविरोधात आता नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अमित उर्फ पप्पू हा फरार झाला असून त्याने ढाब्यालाही कुलूप लावलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
sana khan murder case : बेपत्ता असलेल्या भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्या, कुख्यात आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल