advertisement

Nagpur News: गाडीत रक्ताचे डाग अन् आरोपी बेपत्ता; सना खान प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर पोलीस जबलपूरला रवाना

Last Updated:

सना खान ह्या नागपूर पश्चिम महिला भाजपच्या पदाधिकारी असून त्या मागील आठ दिवसापासून बेपत्ता होत्या. त्यांना जबलपूर येथून एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती

सना खान प्रकरण
सना खान प्रकरण
उदय तिमांडे, नागपूर 11 ऑगस्ट : भाजप पदाधिकारी सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. आता या प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलीस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केलं आहे.
जबलपूर येथील गुंड पप्पू साहू याच्याबरोबर लग्नानंतर सना खान यांचे वाद झाले होते. पप्पू साहू याच्या नोकरालाही पोलिसांनी याआधी ताब्यात घेतलं होतं. पप्पू साहू याच्या कारमधून रक्ताचे डाग धुवून काढल्याची माहिती नोकराने यावेळी दिली होती.
सना खान ह्या नागपूर पश्चिम महिला भाजपच्या पदाधिकारी असून त्या मागील आठ दिवसापासून बेपत्ता होत्या. त्यांना जबलपूर येथून एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्या एक ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची तक्रार सना खान यांच्या आईने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये केली होती.
advertisement
अखेर सना खान यांचा खून झाल्याचं निष्पन्न झालं. पप्पू साहूच्या नोकराने कबुली दिली की त्याने गाडीच्या डिक्कीतील रक्त साफ केलं होतं. यासोबतच मृतदेह हिरन नदीत फेकल्याचेही त्याने सांगितले.  सनाच्या हत्याकांडात मुख्य आरोपी पप्पू साहू याच्याविरोधात आता नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अमित उर्फ पप्पू हा फरार झाला असून त्याने ढाब्यालाही कुलूप लावलं आहे .
view comments
मराठी बातम्या/नागपूर/
Nagpur News: गाडीत रक्ताचे डाग अन् आरोपी बेपत्ता; सना खान प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर पोलीस जबलपूरला रवाना
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement