एक फोन अन् अख्ख पोलीस स्टेशन हादरलं; नागपुरात नेमकं काय घडलं?

Last Updated:

नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा फोन एका अज्ञात व्यक्तीनं पोलिसांना केला होता. या फोनमुळे खळबळ उडाली.

News18
News18
नागपूर, 3 ऑगस्ट, उदय तिमांडे : नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा फोन एका अज्ञात व्यक्तीनं पोलिसांना केला होता. या फोनमुळे सीताबर्डी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. बॉम्बच्या धमकीनंतर अख्ख पोलीस स्टेशन रिकामं करण्यात आलं. मात्र घटनेबाबत अधिक तपास केला असता कोणीतरी खोडसाळपणा केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला. आता या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी नागपुरातील मध्यवर्ती पोलीस स्टेशन असलेल्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात एक निनावी फोन आला. या व्यक्तीनं पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. या फोनमुळे पोलीस सतर्क झाले, पोलीस ठाणे रिकामं करण्यात आलं. बॉम्बचा कसून शोध घेण्यात आला, मात्र पोलीस ठाण्यात काहीही आढळून आलं नाही. कोणीतरी खोडसाळपणानं फोन केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणात आता पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
advertisement
आरोपीचा शोध सुरू  
बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. एक निनावी फोन आला होता. त्यानंतर तपास केला असता काहीही आढळून आले नाही. या प्रकरणातील आरोपीचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
एक फोन अन् अख्ख पोलीस स्टेशन हादरलं; नागपुरात नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement