instagram ने आणलं नवं फीचर! आता रिल्स बोलेल तुमची भाषा, पाहा कशी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
इंस्टाग्रामने आपल्या यूझर्ससाठी एक बदल आणला आहे. ज्यामुळे रिल्स पाहणे आणि तयार करण्याचा एक्सपीरियन्स पूर्णपणे बदलू शकतो. कंपनी लवकरच रील्समध्ये एआयच्या मदतीने आवाज आणि भारतीय भाषांमध्ये बदलण्याची सुविधा सुरु करणार आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून तुम्ही रिल्सला बंगाली, तामिळ, तेलुगु , कन्नड आणि मराठीमध्ये ऐकू शकाल.
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम पुन्हा एकदा त्यांच्या यूझर्ससाठी एक मोठा बदल करत आहे. या बदलामुळे रील्स तयार करणाऱ्या आणि पाहणाऱ्या लाखो यूझर्सचा अनुभव पूर्णपणे बदलून जाईल. कंपनी आता त्यांच्या यूझर्ससाठी त्यांच्या एआय व्हॉइस ट्रान्सलेशन फीचरची एक नवीन व्हर्जन सादर करत आहे. या नवीन फीचरमध्ये पाच नवीन भारतीय भाषा येतील. हे फीचर लवकरच वेगवेगळ्या भाषांमुळे जाणवणारे अंतर दूर करू शकते. या नवीन फीचरमुळे, तुम्ही आता रील्सवर बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मराठी भाषेत तुमचा स्वतःचा आवाज ऐकू शकता. यातील खास गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये आवाज बदलल्यानंतरही, क्रिएटर्सच्या आवाजाची शैली आणि भाव सारखाच राहील.
रील्स आता जास्त लोकांपर्यंत पोहोचतील
या नवीन फीचरनंतर आता क्रिएटरच्या रील्स जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. आता त्यांना एकच रील वारंवार वेगळ्या भाषेत बनवण्याची गरज नाही. एका व्हिडिओच्या माध्यमातूनच अनेक भाषांच्या प्रेक्षकांपर्यंत ते आपली रिल्स पोहोचवू शकतील. छोटी शहरं आणि परिसरांमधील क्रिएटर्सलाही पुढे येण्याची संधी मिळेल. रील्स पाहणाऱ्यांनाही या फिचरचा फायदा होईल. आता त्यांना कोणतीही भाषा समजण्यात अडचण येणार नाही. लोक आपल्या आवडीची रील आपल्या भाषेत पाहू शकतात.
advertisement
नवीन फीचर कसे काम करेल
या फीचरसह, जेव्हा यूझर रील अपलोड करतो, तेव्हा त्यांना AI वापरून आवाजाचे भाषांतर करण्याचा एक नवीन पर्याय दिसेल. अपडेटमध्ये भारतीय भाषांची नावे देखील जोडली जातील. येथून, यूझर त्यांच्या पसंतीची भाषा निवडू शकतील. त्यानंतर AI नवीन भाषेशी ओठांच्या हालचाली जुळवेल, ज्यामुळे असे दिसून येईल की दुसरी व्यक्ती प्रत्यक्षात ती भाषा बोलत आहे. यूझर त्यांच्या गरजेनुसार हे फीचर चालू किंवा बंद करू शकतात.
advertisement
एडिटिंगमध्येही भारतीय टच दिसेल
इंस्टाग्रामने केवळ आवाजातच नव्हे तर टेक्स्ट स्टाइलिंगमध्येही भारतीय स्पर्श आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी त्यांच्या एडिट अॅपमध्ये भारतीय भाषेचे फॉन्ट जोडत आहे. यामुळे यूझर्सना हिंदी, मराठी, बंगाली आणि आसामी यासारख्या भाषांमध्ये सुंदर देवनागरी आणि बंगाली-आसामी लिपींमध्ये मजकूर आणि कॅप्शन लिहिता येतील. तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहिलेला मजकूर रील्सला आणखी पर्सनल बनवेल.
advertisement
अँड्रॉइड यूझर्सला पहिले मिळेल अपडेट
हा नवा बदल सर्वात आधी अँड्रॉइड यूझर्ससाठी येणरा आहे. अॅप अपडेट होताच एडिट्समध्ये नवीन फोटो आपोआप दिसतील. गरज पडल्यावर यूझर फॉन्ट लिस्टमध्ये जाऊन भाषेच्या हिशोबाने ते निवडू शकतील.
advertisement
एडिटमध्ये नवीन भारतीय फॉन्ट कसे वापरायचे?
इंस्टाग्रामवर नवीन अपडेट आल्यावर, अँड्रॉइड यूझर्सना ते सर्वात आधी मिळेल. एकदा अॅप अपडेट झाल्यानंतर, नवीन फॉन्ट आपोआप एडिटमध्ये दिसतील. हे करण्यासाठी, तळाशी असलेल्या टूल ट्रेमध्ये 'टेक्स्ट' वर टॅप करा. येथे, तुम्ही 'Aa' आयकॉनवर क्लिक करून फॉन्ट लिस्टमध्ये प्रवेश करू शकता. येथून, यूझर त्यांच्या भाषेनुसार फॉन्ट देखील निवडू शकतात. हा नवीन बदल प्रथम अँड्रॉइड यूझर्ससाठी उपलब्ध असेल.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 7:21 PM IST









