VBA : प्रस्थापितांना घाम फोडणाऱ्या वंचित आणि MIM आज पालिका निवडणुकीत कुठे? दोन्ही पक्षाची विजयी आकडेवारी
- Published by:Sachin S
Last Updated:
वंचितसोबत लढ्यात असाउद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने साथ दिली होती. पण, आता पालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या जागेवर पोहोचले आहे.
मुंबई: महाराष्ट्रात 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. कोविड काळानंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. तब्बल ८ वर्षानंतर होत असलेली ही निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कुणासोबत युती केली तर काही ठिकाणी स्वबळावर लढवली आहे. खास करून प्रस्थापितांविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी स्थापन केली. वंचितसोबत लढ्यात असाउद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने साथ दिली होती. पण, आता पालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या जागेवर पोहोचले आहे.
वंचित आघाडीने अलीकडे नगरपरिषद निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारली होती. ६ ठिकाणी नगराध्यक्ष आणि १०० पेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे पालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने २९ महापालिकांमध्ये आपले उमेदवार उभे केले. मुंबई महापालिकेमध्ये वंचितने काँग्रेससोबत आघाडी केली. तर लातूरमध्येही काँग्रेससोबतच लढले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार वंचित आघाडीने राज्यभरात अनेक ठिकाणी नगरसेवक विजयी झाले आहे. पण ही संख्या मर्यादीत आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सोलापूर महापालिकेमध्ये वंचितचे काही उमेदवार विजयी झाली आहे. मुंबईत मात्र भोपळाही फोडता आला नाही. वंचित आघाडीच्या ट्वीटवर मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास राज्यभरात 25 ते ३० नगरसेवक निवडणूक आल्याची माहिती आहे.
advertisement
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार वंचितची विजयी संख्या ( अंतिम अपडेट बाकी)
लातूर ०४
अकोला १४
सोलापूर ०३
छत्रपती संभाजीनगर ०४
मुंबई (BMC) ०१
MIM कुठे?
तर एमआयएमने महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतला होता. एमआयएमने राज्यभरात ९५ पेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये एमआयएमने आपला जुना रेकॉर्ड कायम ठेवला आहे. एमआयएमने २४ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर मुंबईतही एमआयएमचे ८ उमेदवार विजयी झाले आहे. या व्यतिरिक्त मालेगावमध्ये एमआयएम सत्तेत आलं नाही पण जास्त जागा जिंकल्या आहे. तसंच नागपूरमध्येही एमआयएमने धडक मारली आहे.
advertisement
एमआयएमने किती जागा जिंकल्या
छत्रपती संभाजीनगर २४
नागपूर (NMC) ०९
सोलापूर ०८
मालेगाव २१
मुंबई (BMC) ०३
खरंतर लोकसभा निवडणूक 2019 वंचित आणि एमआयएमने एकत्र लढवली होती. पण, एमआयएमने मतदानात मदत न केल्यामुळे वंचित आघाडीने युती तोडली होती. पण आता दोन्ही पक्षाचा आलेख पाहता वंचित आघाडी आणि एमआयएमला मिळणारी मतं ही एकगठ्ठा असली तरी त्यामुळे विभाजनाचा फटका बसत आहे. खास करून वंचित आघाडीला अनेक ठिकाणी मत विभाजनामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. तर उलट एमआयएमला मुस्लिम बहुल भागात एकगठ्ठा मतदान मिळत आहे. त्यामुळे एमआयएमने पालिका निवडणुकीत आता वंचितपेक्षा आघाडी घेतली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 7:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VBA : प्रस्थापितांना घाम फोडणाऱ्या वंचित आणि MIM आज पालिका निवडणुकीत कुठे? दोन्ही पक्षाची विजयी आकडेवारी









