LIVE NOW

BMC Election Result 2026 Live: मुंबईत कोणाचा महापौर होणार? एकनाथ शिंदेंनी क्लिअर कट सांगितले

Last Updated:

BMC Election Result: राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर होत असताना, मुंबई महानगरपालिकेतील सत्तासमीकरणाने संध्याकाळपर्यंत नाट्यमय वळण घेतले आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेली भाजप–शिवसेना महायुती 105 जागांवर अडकल्याने आता मुंबईतील सत्ता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

News18
News18
राज्यातील 29 महानगरपालिकेचा निकाल आज सकाळपासून जाहीर होण्यास सुरूवात झाली. जवळजवळ सर्वच पालिकेत भाजप आणि महायुतीची सत्ता आली असताना संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगर पालिकेत भाजप आणि शिवसेनेने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. मात्र संध्याकाळी लढतीचे चित्र पूर्णपणे फिरले. पालिकेवर भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता सहज सत्ता येईल असे वाटत असताना आता महायुतीचे घोडे 105 जागांवर थांबल्याचे चित्र आहे. अशात सत्ता समीकरणातील चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jan 16, 20269:13 PM IST

महापौरपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट- शिंदेंच्या शिवसेनेला काँग्रेसकडून मोठा धक्का

मुंबई महापालिकेत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार शिवसेनेला 28 जागा तर काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहे. पक्ष फुटीनंतर शिंदेकडे शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव आले होते. असे असले तरी मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तोडीची कामगिरी काँग्रेस पक्षाने करून शिंदेंच्या सेनेला मोठा धक्का दिला आहे.

Jan 16, 20268:34 PM IST

महापालिका निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईकर, ठाणेकरांना आणि राज्यातील सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभार ही मानतो. ठाण्यात 71 जागांवर विजय आणि 4 मध्ये आघाडीवर आहोत. गेल्यावेळी 67 जागा जिंकल्या होत्या. ठाण्यात आम्हाला स्पष्ट बहुमत. ठाणेकरांचे अभिनंदन आणि धन्यवाद. मुंबईत देखील आम्ही बहुमताच्या जवळ आलो आहोत. राज्यातील वातावरण महायुतीच्या बाजूने राहिले. MMDRAमध्ये महायुतीला यश मिळाले. मुंबईत महायुतीचा महापौर होईल, ही निवडणुक विकासाच्या आधारावर लढवली. काही जण भावनेच्या आधारावर निवडणूक लढवली. गेल्या साडे तीन वर्षात आम्ही मुंबईत केलेल्या कामावर लोकांनी मते दिली. अनेक प्रकल्प थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली. 25 वर्ष ज्यांनी पालिकेत सत्ता चालवली त्या विरोधात लोकांनी मतदान केले. मुंबईत सत्ता महायुतीला मिळले. लोकांनी विकासाला मतदान दिले.

Jan 16, 20268:26 PM IST

BMC Election Result: ठाकरेंचा गेम कुणी बिघडवला? 'त्या' वॉर्डांमधील आकडे पाहून तुम्हीही चक्रावून जाल!

BMC Election Results : मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) युतीचा थेट फटका शिवसेना (UBT) आणि ठाकरे बंधूंना बसल्याचे स्पष्ट होत आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

advertisement
Jan 16, 20268:22 PM IST

एकनाथ शिंदेंनी मुंबईत महापौरपदाची मागणी केली

शिवसेनेकडून महापौरपदाची मागणी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मुंबईत मोठी मागणी, शिवसेनेने आतापर्यंत मुंबईत 26 जागांवर विजय मिळवला आहे. 

Jan 16, 20268:18 PM IST

मनसेजे विजयी उमेदवार शिवतीर्थाकडे

मुंबईतील मनसेजे विजयी उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थाकडे निघाले

Jan 16, 20268:06 PM IST

मुंबईत अजून कुठे मतमोजणी बाकी?

मतमोजणी बाकी असलेले १२ राहिलेले वॉर्ड७०,७१, ८६, ९६, १०१, १०२, ११९, १२०, १२१ ,१२२, १३३, १८१ : मुंबईतील या १२ ठिकाणी कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष

advertisement
Jan 16, 20268:00 PM IST

संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, पाहू...; मुंबईतील निकालावर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई महापालिका निकाल:

संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत,

६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत.

लढत अटी तटीची आहेच

पण शिवसेना एम न से टक्कर देत आहे!

भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे!

दुपार नंतर शिवसेना मनसे चे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत!

पण न्यूज़ चैनल जुनाच आकडा दाखवीत आहेत!

पाहू….

Jan 16, 20267:56 PM IST

मुंबई प्रभाग क्रमांक 94 मध्ये ठाकरे गटाच्या प्रज्ञा भूतकर यांचा विजय

मुंबई प्रभाग क्रमांक 94 मध्ये ठाकरे गटाच्या प्रज्ञा भूतकर यांचा विजय

Jan 16, 20267:53 PM IST

BMC Election Results : मुंबईच्या निकालात मोठा ट्विस्ट, आकडे फिरले, महायुती ११० जागांच्या खाली, ठाकरेंकडून कडवी झुंज

BMC Election Results: मुंबई महापालिका निवडणुकीचे कल अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत बहुमताचा कल गाठणाऱ्या महायुतीचा आकडा संध्याकाळपर्यंत कमी झाला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Jan 16, 20267:51 PM IST

BMC Election MNS Winner Candidate List: मुंबईत मनसेच्या 'इंजिन'ला ब्रेक, पण राज ठाकरेंच्या ६ रणरागिणींनी उडवला विजयाचा गुलाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी

BMC Election MNS Winner Candidate List: आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मनसेचे ६ उमेदवार विजयी झाले असून यात महिला उमेदवारांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.  संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Jan 16, 20267:43 PM IST

मुंबईत काँग्रेस किंग मेकर, विरोधक एकत्र आल्यास सत्ता समीकरण बदलू शकते

मुंबई मनपाच्या निकालाचे आकडे फिरले असून काँग्रेसने २० जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे सत्ता स्थापनेत काँग्रेस किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे.

Jan 16, 20267:40 PM IST

मुंबई भाजप सर्वात मोठा पक्ष

मुंबई महापालिकेच्या निकालात भाजपला सर्वाधिक ८२ जागा मिळाल्या असल्यातरी भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे बहुमतापासून दूर आहेत.

Jan 16, 20267:37 PM IST

मुंबई महापालिका निवडणूक निकाल रात्री 7.30 वाजता

भाजप- ८२

शिवसेना ठाकरे- ६३

शिवसेना- २६

काँग्रेस- २२

एमआयएम– ८

समाजवादी पार्टी– २

मनसे– ७

राष्ट्रवादी-

राष्ट्रवादी शरद पवार-

Jan 16, 20267:35 PM IST

मुंबईची सत्ता डळमळीत! महायुतीला बहुमताचा धोका

मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 211 जागांचे निकाल जाहीर झाले असून, सत्तास्थापनेचे गणित अद्याप स्पष्ट झालेले नाही. महायुती आघाडीवर असली तरी विरोधक एकत्र आल्यास सत्ता समीकरण बदलू शकते का, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 

मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election Result 2026 Live: मुंबईत कोणाचा महापौर होणार? एकनाथ शिंदेंनी क्लिअर कट सांगितले
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement