तुरीच्या दरात वाढ; कांदा आणि सोयाबिनला किती मिळाला भाव? Video

Last Updated:

16 जानेवारी शुक्रवार रोजी राज्यातील कृषी बाजारात प्रमुख पिकांच्या दरांमध्ये संमिश्र हालचाली पाहायला मिळाल्या. कपाशीच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली असली, तरी कांदा आणि सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. 

+
Maharashtra

Maharashtra Krushi Market updates 

अमरावती : 16 जानेवारी, शुक्रवार रोजी राज्यातील कृषी बाजारात प्रमुख पिकांच्या दरांमध्ये संमिश्र हालचाली पाहायला मिळाल्या. कपाशीच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली असली, तरी कांदा आणि सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. दुसरीकडे तुरीच्या दरात वाढ झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच गुरुवारच्या तुलनेत आज आवक वाढली आहे. प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला पाहुयात.
कपाशीच्या दरात किंचित वाढ
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण आवक 11 हजार 758 क्विंटल इतकी झाली. 3 हजार 750 क्विंटल सर्वाधिक आवक वर्धा मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी कमीत कमी 7650 तर जास्तीत जास्त 8263 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वर्धा मार्केटमध्ये आलेल्या लांब स्टेपल कपाशीला सर्वाधिक 8315 रुपये बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित वाढ झाली आहे.
advertisement
कांद्याच्या दरात घट
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 2 लाख 77 हजार 034 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील नाशिक मार्केटमध्ये 1 लाख 13 हजार 959 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 504 ते जास्तीत जास्त 1642 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या लाल कांद्याला सर्वाधिक 2700 रुपये बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात लक्षणीय घट झाली असल्याचे दिसून आले.
advertisement
सोयाबीनचे दर पुन्हा घसरले
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 39 हजार 597 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची 5 हजार 737 क्विंटल सर्वाधिक आवक वाशिम मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4458 ते जास्तीत जास्त 5709 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज किंचित घट झालेली दिसून येत आहे.
advertisement
तुरीच्या दरात वाढ
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 32 हजार 181 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 9 हजार 110 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी तुरीला 6325 ते 7335 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आलेल्या काळ्या तुरीला 8500 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजार भाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात वाढ झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
तुरीच्या दरात वाढ; कांदा आणि सोयाबिनला किती मिळाला भाव? Video
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement