पोरं अंबाझरी तलावात पोहोण्यासाठी आली अन्...
शिलरत्न बेलेकर अशी मृत पोलीस कर्मचाऱ्याची ओळख पटली आली असून ते वाघदरी-इसासनी परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास काही पोरं अंबाझरी तलावात पोहोण्यासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनंतर, त्या तरुणांनी तातडीने अंबाझरी पोलिसांना याची माहिती दिली. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला.
advertisement
19 फेब्रुवारीपासून ड्युटीवरून गैरहजर
मागील दोन वर्षांपासून शिलरत्न यांचे त्यांच्या पत्नीसोबत सतत वाद सुरू होते. याच कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी आपल्या माहेरी राहत होती आणि शिलरत्न त्यांच्या दोन मुलांसह इसासनी येथील त्यांच्या घरी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांचा ताबा मागितल्यामुळे ते मानसिक तणावात होते. 19 फेब्रुवारीपासून शिलरत्न त्यांच्या ड्युटीवरून गैरहजर होते आणि त्यानंतर ते घरी न परतल्याने त्यांच्या भावाने 22 फेब्रुवारी रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये बदली
दरम्यान, आज सकाळी त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात तरंगताना आढळला. पोलिसांनी तपास सुरू असता त्यांना मृतदेहाजवळ ओळखपत्र सापडलं आणि त्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत शिलरत्न बेलेकर यांची काही महिन्यांपूर्वी हिंगणा पोलीस ठाण्यातून प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती.
