TRENDING:

'मुघल अ आझम' मध्ये दिलीपकुमारांसाठी बनवली होती शेरवानी, मराठी सेलिब्रिटींची फेव्हरेट छ.संभाजीनगरची खास हिमरू शाल

Last Updated:

Himroo Shawl Making: 'मुघल-ए-आझम' मध्ये प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी परिधान केलेला पोशाख येथे विणलेल्या हिमरू कापडाचा होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
छत्रपती संभाजीनगर : इतिहासाच्या पदरात दडलेले छत्रपती संभाजीनगर हे शहर आजही एका नाजूक, राजेशाही कलेचा ठेका जपत आहे. ती कला म्हणजे ‘हिमरू’. नवाबपुरा भागातील इम्रान कुरेशी यांचे कुटुंब सहाव्या पिढीतून ही परंपरा जिवंत ठेवत, हातमागावर धाग्यांना संस्कृतीची ओळख विणत आहे. पर्शियातून भारतात आलेली आणि दौलताबादच्या भूमीत रुजलेली ही कला आज संभाजीनगरच्या अस्मितेचा अविभाज्य भाग बनली आहे.
advertisement

भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकृती 'मुघल-ए-आझम' मध्ये प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी परिधान केलेला पोशाख हा 'औरंगाबाद हिमरू फॅक्टरी' छत्रपती संभाजीनगर येथे विणलेल्या हिमरू कापडाचा होता. हा ऐतिहासिक वारसा आजही नवाबपुऱ्याच्या लूमवर जिवंत आहे. परंपरा, कष्ट आणि कौशल्य यांचा संगम असलेल्या या कलेचा प्रवास, वैशिष्ट्ये आणि आजच्या काळातील आव्हाने, याबद्दल सविस्तर माहिती लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

advertisement

‘त्या’ हल्ल्यात स्मृती गेली; अपघातामुळे परत आली, 32 वर्षांनी गाव आठवलं अन्...बीडच्या प्रकाशची सिनेमाला लाजवणारी कहाणी

हिमरू म्हणजे नेमकं काय? 

'हिमरू' हे नाव मूळ पर्शियन शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ 'रिप्लिका' (हुबेहूब नक्कल) असा होतो. सुरुवातीला या कलेला 'केमखाब' म्हटले जायचे. इतर हँडलूम कापडांमध्ये डिझाइनसाठी 'जकार्ड' किंवा 'डॉबी' मशीनचा वापर होतो, पण अस्सल हिमरूमध्ये कोणत्याही जकार्ड मशीनशिवाय केवळ मानवी कौशल्याने विणकाम केले जाते. हे विणकाम जगातील इतर कोणत्याही कापडापेक्षा वेगळे आणि अत्यंत क्लिष्ट असते.

advertisement

हिमरू हे पूर्णपणे हाताने विणले जाणारे कापड आहे. यासाठी दोन कारागिरांची गरज असते, जे एकाच वेळी ताळमेळ बसवून काम करतात. यात कोणतीही आधुनिक यंत्रणा वापरली जात नाही, त्यामुळे प्रत्येक धागा हाताने सेट करावा लागतो. यामुळेच यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतात. एक मीटर हिमरू शाल किंवा कापड तयार होण्यास लागणारा वेळ जवळपास 12 ते 15 दिवसांचा असतो. हे काम अत्यंत कष्टाचे आणि वेळखाऊ आहे. विणकामाची गुंतागुंत आणि डिझाइनच्या बारकाव्यावर हा वेळ अवलंबून असल्याचे इम्रान कुरेशी यांनी बोलताना सांगितले.

advertisement

दिलीप कुमार यांची कारखान्याला भेट

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी परिधान केलेली शेरवानी आणि लांब कोट अस्सल हिमरू (केमखाब) पासून 'औरंगाबाद हिमरू फॅक्टरीत' बनवले होते. त्यावेळी ते शुद्ध जरीच्या तारांमध्ये विणले गेले होते. यावेळी अभिनेते दिलीप कुमार व दिग्दर्शक के. असिफ या ठिकाणी आले होते. या कारखान्याला भेट दिली व चार ते पाच प्रकारचे कपडे त्यांनी चित्रपटासाठी बनवून घेतले.

advertisement

आजही आम्ही तोच 'दिलीप कुमार पॅटर्न’ कॉटन आणि जरीमध्ये तयार करतो, ज्याला मोठी मागणी असते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि जयपूरच्या महाराणी यांनीही या कलेची प्रशंसा केली. तसेच याबरोबरच या ठिकाणी मराठी सिने अभिनेत्री सई ताम्हणकर, यासह विविध अभिनेते व अभिनेत्रींनी भेट दिलेली आहे, असे देखील कुरेशी यांनी सांगितले.

हिमरूची किंमत किती?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आरोग्यासाठी पौष्टिक, नाश्त्याला घरीच बनवा उपम्याचे खमंग कटलेट, रेसिपीचा Video
सर्व पहा

हिमरू हे अत्यंत प्रीमियम कापड आहे. याची किंमत त्याच्या डिझाइन आणि मेहनतीवर ठरते, साधारणपणे 4500 ते 6,000 रुपये प्रति मीटर या दराने हे कापड मिळते. यामध्ये साड्या बनवल्या जात नाहीत. बाहेर हिमरूच्या नावाने विकल्या जाणाऱ्या साड्या बहुधा बनावट असतात. ग्राहकांनी अस्सल हँडलूम हिमरूची ओळख पटवूनच खरेदी करावी, जेणेकरून या ऐतिहासिक कलेचे शोषण थांबवता येईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
'मुघल अ आझम' मध्ये दिलीपकुमारांसाठी बनवली होती शेरवानी, मराठी सेलिब्रिटींची फेव्हरेट छ.संभाजीनगरची खास हिमरू शाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल